एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये किरण खेर यांचे नाव घेतले जाते. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अभिनयासोबतच किरण खेर या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असायच्या. त्यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्याशी लग्न केले होते. पण अनुपम खेर यांचे हे दुसरे लग्न होते. आज १४ जून रोजी किरण खेर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया त्यांच्या लव्हस्टोरी...
किरण आणि अनुपम खेर यांचे एकमेकांशी लग्न होण्याआधी दोघांचीही पहिले संसार मोडले होते. याच कठीण काळात त्यांना एकमेकांचा आधार मिळाला. दोघांनी मिळून या कठीण वेळेचा सामना केला आणि दरम्यान ते कायमचे एकमेकांचे सोबती बनले.
वाचा: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने लग्नाच्या चर्चांवर केला शिक्कामोर्तब, लग्नपत्रिका व्हायरल
अनुपम खेर आणि किरण खेर सुरुवातीला एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. किरण खेर चंदिगडमध्ये ज्या थिएटर ग्रुपशी संबंधित होत्या, त्याच थिएटर ग्रुपमध्ये अनुपम खेर देखील होते. त्यावेळी किरण खेर या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तर, अनुपम हे संघर्ष करत होते. दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले. मात्र, दोघांचे आधीच लग्न झालेले होते. अनुपम खेर यांनी १९७९मध्ये अरेंज मॅरेज केले होते. पण ते या नात्यातून काहीच वर्षात वेगळे झाले होते. तर, किरण यांचे लग्न १९८०मध्ये मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती गौतम बेरी यांच्याशी झाले होते. मात्र, त्यांचा संसार अवघा पाच वर्षेच टिकला.
वाचा: अजिंक्य देव आणि अश्विनी भावे २५ वर्षांनंतर एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात
या कठीण काळात किरण खेर आणि अनुपम खेर दोघेही चंदीगडनंतर मुंबईत येऊन करिअरमध्ये संघर्ष करत होते. त्याचवेळी अनुपम खेर यांचा त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. यानंतर किरण खेर आणि त्यांच्या पतीलाही समजले की, आता त्यांचे हे लग्न फार काळ चालणार नाही आणि दोघांनीही घटस्फोट घेतला. अनुपम आणि किरण दोघांच्या आयुष्यात एकच परिस्थिती होती. त्यांनी एकमेकांना मैत्रीचा आधार दिला. मात्र, या मैत्रीत हळूहळू प्रेम फुललं. यानंतर १९८५मध्ये किरण यांनी अनुपम यांच्यासोबत लग्न केले. किरण यांना त्यांच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे, त्याचे नाव सिकंदर आहे.
वाचा: काजोलला चांदेकरांनी काढले घराबाहेर, काय असेल कलाचे पाऊल? वाचा 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मध्ये काय होणार
संबंधित बातम्या