Raha Kapoor: आलिया भट्टच्या ड्रेसपेक्षा छोट्या राहाचा फ्रॉक महाग, किंमत ऐकून बसेल झटका
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raha Kapoor: आलिया भट्टच्या ड्रेसपेक्षा छोट्या राहाचा फ्रॉक महाग, किंमत ऐकून बसेल झटका

Raha Kapoor: आलिया भट्टच्या ड्रेसपेक्षा छोट्या राहाचा फ्रॉक महाग, किंमत ऐकून बसेल झटका

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 26, 2024 05:59 PM IST

Raha Kapoor: कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस लंचचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी पुन्हा एकदा घरातील सर्वात लहान सदस्य राहाने सर्वांची मने जिंकली. तिच्या फ्रॉकची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

Raha Kapoor
Raha Kapoor

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी या कपलची लाडकी मुलगी पॅप्ससमोर आली होती. यावर्षीही आलिया राहाला फॅमिली ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये घेऊन जात असताना मीडिया समोर आली. राहाने फोटोग्राफर्सला चांगली पोझ दिली. राहाचा आई-वडिलांसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, सर्वांचे लक्ष राहाच्या फ्रॉकवर होते. तिच्या फ्रॉकची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

किती आहे राहाच्या फ्रॉकची किंमत

रणबीर कपूरची मुलगी राहा महागड्या फ्रॉकमध्ये इंटरनेटची फेव्हरेट बनली आहे. काही लोकांना राहामध्ये राज कपूर यांची झलक दिसते तर काहींना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची झलक दिसते. राहाचा चेहराही आलियाच्या लहानपणीच्या फोटोंशी जुळतो. ख्रिसमसच्या दिवशी राहा तिचे वडील रणबीर कपूरसोबत फोटोग्राफर्सना भेटली होती. तिने पांढरा फ्रॉक घातला होता. आता रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, राहाच्या या फ्रॉकची किंमत 38,389 रुपये आहे. हा इटालियन ब्रँड मोनालिसाचा असल्याचे सांगितले जात आहे.
वाचा: राजघराण्याशी संबंध, दोन घटस्फोट, लग्न न करताच बाळाला दिला जन्म; कोण होती संजय दत्तची दुसरी पत्नी?

आलियाच्या ड्रेसची किंमत किती?

विशेष म्हणजे राहासोबत तिची आई आलियाही होती. तिने लाल रंगाचा व्ही-नेक ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसची किंमत ६५९० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. आलियाचा हा आउटफिट समर समवेअर ब्रँडचा आहे. राहाचे कपडे याआधीही चर्चेत राहिले आहेत. गणेशोत्सवाच्या वेळी तिच्या हिरव्या रंगाच्या कस्टममेड ड्रेसची किंमतही १७००० रुपये असल्याचे सांगितले जात होते.

Whats_app_banner