'ए मामू' म्हणत प्रेक्षकांची मने जिंकणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे संजय दत्त. तो नेहमीच त्याच्या चित्रपटांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. संजय दत्तने आतापर्यंत तीन लग्न केले. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर संजय दत्त पूर्णपणे खचून गेला होता. त्याने रिया पिल्लईशी दुसरे लग्ने केले. पण मुंबई बॉम्बस्फोटात संजय दत्तचे नाव आल्यामुळे त्याला अटक झाली. त्यानंतर संजय दत्त आणि रिया यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. आता रिया नेमकी कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया रियाविषयी...
रिया पिल्लईचे संजय दत्तवर प्रचंड प्रेम होते. जेव्हा संजयला अटक झाली तेव्हा ती कोलमडली होती. ती तुरुंगात कैद असलेल्या संजय दत्तला सतत भेटायला जायची. याच भेटीगाठीदरम्यान दोघेही तुरुंगात एकमेकांच्या प्रेमात पडले आणि संजय तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी लग्न केलं होतं. आज या दोघांची प्रेम कहाणी व रियाच्या आयुष्यातील काही किस्से आपण जाणून घेऊयात...
रिया पिल्लईचा जन्म २७ जून १९६५ रोजी लंडनमध्ये झाला होता. हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची रिया नात आहे. संजय दत्तच्या आयुष्यात येण्यापूर्वीचे रियाचे एक लग्न झाले होते. रियाने १९८४ मध्ये मायकेल वाझशी रियाने लग्न केले होते. परंतू काही दिवसांनी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जवळपास १० वर्षांनी १९९४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रियाने नंतर एअरहोस्टेस म्हणून काम करायला सुरुवात केली. यासोबतच तिने मॉडेलिंगही सुरू केलं. त्यादरम्यान तिची संजय दत्तशी मैत्री झाली, मात्र मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त तुरुंगात गेला. ती संजयला भेटण्यासाठी अनेकदा तुरुंगात जात असे. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. संजय दत्त तुरुंगातून सुटल्यावर त्याने रियाला प्रपोज केले आणि दोघांनी साई मंदिरात लग्न केले.
रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर संजय दत्त आणि रिया एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत होते. नंतर संजय दत्त शूटिंगमध्ये व्यग्र झाला, त्यामुळे तो रियाला वेळ देऊ शकत नव्हता. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला होता. या दरम्यान, रियाचे नाव लिएंडर पेसशी जोडले गेले आणि संजयच्या आयुष्यात डान्सर नादिया दुर्राणीची एण्ट्री झाली. नंतर अवघ्या काही वर्षातच ते वेगळे झाले आणि २००८ मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला.
वाचा: वहिदा रहमान यांनी डेब्यू केलेला सिनेमा आठवतोय का? ठरला होता १९५६मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
संजय दत्तपासून घटस्फोट घेतल्यानंतर रिया पिल्लईने टेनिसपटू लिएंडर पेससोबत अफेअर सुरु झाले होते. ते दोघेही एकत्र राहू लागले होते. दोघांना एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव आयान असे ठेवले. मात्र, काही काळानंतर या नात्यातही दुरावा निर्माण झाला आणि रियाने लिएंडर पेसवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्यावेळी लिएंडरने न्यायालयात सांगितलं की त्याने रियाशी कधीही लग्न केलं नाही. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. तर, रियाने लिएंडरवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. सध्या रिया एकटीच मुलीचा सांभाळ करत आहे.
संबंधित बातम्या