व्ही शांताराम म्हणजे हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक. चित्रपटांव्यतिरिक्त व्ही शांताराम यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील खूप चर्चा झाली. शांताराम यांनी तीन लग्न केली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमलाबाई, दुसऱ्या पत्नीचे नाव जयश्री आणि तिसऱ्या पत्नीचे नाव संध्या. मात्र यासोबतच त्यांच्या आयुष्यात अनेक अशा स्त्रिया आणि विचित्र प्रसंग आले ज्यांची त्याकाळात मोठी चर्चा झाली. व्ही शांताराम यांच्या द मॅन हू चेंज्ड इंडियन सिनेमा बायोग्राफी मध्ये त्यांच्या स्त्री कलाकारासोबत असलेल्या संबंधावर अनेक किस्से नमूद केले आहेत.
१९२१ मध्ये व्ही शांताराम यांचं लग्न विमलाबाई यांच्यासोबत झाले. त्या १२ वर्षांच्या होत्या तर शांताराम २१ वर्षांचे होते. याच वर्षी व्ही शांताराम यांना हिरो म्हणून पहिला सिनेमा मिळाला. बाबुराव पेंटर यांचा सुरेखा हरण हा चित्रपट करत असताना या चित्रपटाच्या शूट दरम्यान घडलेला हा किस्सा. व्ही शांताराम हे दिसायला देखणे होते म्हणून या चित्रपटातील अनेक स्त्री कलाकार त्यांच्या सौंदर्यावर भाळल्या होत्या.
व्ही शांताराम शॉट पूर्वी सर्वांचा मेकअप तपासून पाहायचे. एक दिवस ते मेकअप रूममध्ये अभिनेत्रीचा मेकअप पाहायला गेले असता त्यांच्या समोर विचित्र प्रसंग उभा राहिला. शांताराम हे नायिकेच्या शोधात मेकअप रूम मध्ये गेले असता ती अभिनेत्री निवस्त्र होऊन शांताराम यांच्यासमोर उभी राहिली. त्या अभिनेत्रीला व्ही शांताराम आवडत होते. आपला सौंदर्य पाहून कदाचित ते आपल्याला जवळ करतील असा होता. चित्रपटातील इतर स्त्री कलाकरांना देखील याबाबत माहित होती त्यामुळे त्या देखील व्ही शांताराम आता काय करतात हे पाहण्यासाठी लपून हा सर्व प्रसंग पाहू लागल्या होत्या. मात्र त्या अभिनेत्रीला नग्नवस्थेत पाहून व्ही शांताराम थबकले. त्या अभिनेत्रीला व्ही शांताराम म्हणाले, तुम्ही कपडे बदल मी १५ मिनिटांनी येतो. त्यावेळी व्ही शांताराम यांच वागणं पाहून सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता.
व्ही शांताराम यांचासमोर असे अनेक मोहाचे क्षण आले. १९९३ मध्ये व्ही शांताराम यांचा सैरंध्र हा भारतातील पहिला रंगीत चित्रपट जर्मनीच्या UFO स्टुडिओमध्ये प्रक्रियेसाठी नेण्यात आला होता. त्यावेळी जर्मनीमध्ये जेनी नावाची तरुणी त्यांची सहाय्यक होती. जेनी व्ही शांताराम यांचा प्रेमात वेडी झाली होती. एक दिवस जेनीने व्ही शांताराम यांच्यासोबत एकांतात असताना, स्वतःचे कपडे उतरवत निवस्त्र होऊन त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. ते पाहून शांताराम याना धक्का बसला त्यांनी त्वरित जवळपास असलेली चादर तिच्या अंगावर फेकली आणि तिला कपडे घालायला सांगितले.
वाचा: शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात आणखी दोन मजल्याची पडणार भर; गौरी खानचा राज्य सरकारकडे अर्ज
व्ही शांताराम यांनी आपल्या आयुष्यात ३ स्त्रियांशी लग्न केले. पण व्ही शांताराम यांची स्त्रियांच्या सौंदर्याची कल्पना अनोखी होती. त्यांच्या मते, “सुंदर पोशाख असलेली स्त्री जास्त सुंदर दिसते. तर दुसरीकडे, नग्नतेमध्ये एक स्तभता जाणवते.'' व्ही शांताराम यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचा कायम सन्मान राखला होता.
संबंधित बातम्या