Mahesh Manjrekar: महेश मांजरेकरांची पहिली पत्नी आहे तरी कोण? वाचा तिच्याविषयी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahesh Manjrekar: महेश मांजरेकरांची पहिली पत्नी आहे तरी कोण? वाचा तिच्याविषयी

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकरांची पहिली पत्नी आहे तरी कोण? वाचा तिच्याविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 13, 2024 11:57 AM IST

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर हे दुसरी पत्नी मेधा यांच्यासोबत राहातात. अनेकांना मेधा आणि महेश यांचे दुसरे लग्न असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे.

Mahesh Manjrekar
Mahesh Manjrekar

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचं आणि लोकप्रिय नाव म्हणजे दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर. आपल्या कणखर स्वभावासाठी ओळखले जातात. महेश मांजरेकर यांचं व्यावसायिक आयुष्यासाठी चर्चेत असतात तितकेच ते त्याचं खाजगी आयुष्य देखील चर्चेत असतं. आज महेश मांजरेकर यांच्याकडे फॅमिली मॅन म्हणून पाहिलं जातं. त्यांचे बऱ्याचदा त्यांचा कुटुंबासोबतचे फोटो व्हायरल होतात. पण तुम्हाला माहिती आहे का ,की महेश यांची २ लग्न झाली आहेत. मेधा मांजरेकर ही त्यांची दुसरी पत्नी आहे, महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी कोण आहे माहित आहे का? चला जाणून घेऊया..

महेश मांजरेकर यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्याविषयी जाणून घेण्यात चाहत्यांनाही तितकाच रस असतो. फिल्मी करिअरप्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही ते चर्चेत असतात. महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर या दोघांची जोडीही रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरत असते. मेधा मांजरेकरसोबत महेश मांजरेकर यांचे दुसरे लग्न आहे

कोण आहे महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी?

महेश मांजरेकर यांचे पहिले लग्न दीपा मेहता यांच्याशी झाले होते. दीप मेहता या फॅशन डिझाइनर आहेत. दीपा मेहता यांचा अभिनयाशी काहीही संबंध नसला तरी त्या क्वीन ऑफ हार्टस या साड्यांचा ब्रँड चालवतात.त्यांच्या साड्यांना मराठी सृष्टीतूनच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यांची मुलगी अश्वमी मांजरेकर या ब्रँडसाठी मॉडेलिंगचे कामही करते. अश्वमीसुद्धा अभिनयक्षेत्रात आपले नशीब आजमवत आहे. दीपा मेहता यांच्यापासून महेश यांना सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर ही दोन मुले आहेत. काही कारणामुळे महेश आणि दीपा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मुलं मात्र अश्वमी-सत्या महेश मांजरेकर यांच्याकडेच राहतात.

दीपा मेहता या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असल्याचे दिसून येते. त्यांची ही दोन्ही मुले आज आपल्या आईकडे राहत असली तरी महेश मांजरेकर यांचाही लळा आहे. त्यामुळे बऱ्याचदा ही मुलं महेश मांजरेकर यांच्याकडे राहायला येतात. मेधा मांजरेकर या महेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नी. मेधा सोबत त्यांचे लव्ह मॅरेज झाले आहे.
वाचा: दीपिकापेक्षा करीनाने घेतली जास्त फी, वाचा ‘सिंघम अगेन’मधील कलाकारांच्या मानधनाविषयी

मेधा आणि महेश यांच्याविषयी

मेधा आणि महेश मांजरेकर दोघेही एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेत संसार थाटला. मेधा सोबत महेश मांजरेकर यांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. मेधा आणि महेश मांजरेकर यांना सई मांजरेकर ही एक मुलगी आहे. सई मांजरेकरला बॉलिवूडचा गॉडफदार सलमान खाननेच लॉन्च केले होते. सई सलमान खानसोबत 'दबंग ३' सिनेमात झळकली होती. तिच्या भूमिकेलाही रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

Whats_app_banner