छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉसचा १८वा सिझन सुरु झाला आहे. हा सिझन प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. १८ वा सिझन सुरु एकच महिना झाला आहे. तरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बिग बॉस चा शो जेव्हा जेव्हा सुरु होतो तेव्हा प्रत्येक वेळी त्या सीझनच्या स्पर्धकांच्या फीची चर्चा होते. आता एक रिपोर्ट आला आहे. या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण आहेत चला जाणून घेऊया...
कोइमोईच्या रिपोर्टनुसार, विवियन डिसेना हा या सीझनचा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक आहे. त्यांना एका आठवड्यासाठी पाच लाख रुपये दिले जात आहेत. विवियन सर्वाधिक फी घेत असला तरी त्याची फी अंकिता लोखंडेच्या फीच्या निम्मी असल्याचे बोलले जात आहे. खरं तर अंकिता गेल्या सीझनमध्ये म्हणजेच बिग बॉस १७मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक होती. अभिनेत्रीला एका आठवड्यासाठी १२ लाख रुपये दिले जात होते, असे म्हटले जात होते.
विवियननंतर जास्त फी घेणारी शिल्पा शिरोडकर ही दुसरी स्पर्धक आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस हिंदीमधील स्पर्धक शिल्पाला दर आठवड्याला २ लाख ५० हजार रुपये दिले जात आहेत. शिल्पानंतर करणवीर मेहरा २ लाख घेतो आणि रजत दलाल १.५० लाख घेतो. याशिवाय इतर स्पर्धकांच्या मानधनाविषयी माहिती समोर आलेली नाही.
वाचा: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं
तसंच या सीझनबद्दल असंही बोललं जात आहे की, सलमानने या सीझनच्या फीमध्येही वाढ केली आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान या सीझनसाठी महिन्याला ६० कोटी रुपये मानधान घेत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सलमान या सीझनच्या अखेरपर्यंत २५० कोटी रुपये घेणार आहे.
संबंधित बातम्या