प्रसिद्ध दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांनी मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अभिनयाने स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मात्र दुर्दैवाने २०१२ साली त्यांचे अपघाती निधन झाले. मात्र आजही त्यांनी केलेल्या भूमिकांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, आनंद अभ्यंकर यांची मुलगीदेखील एक कलाकार असून ती सिनेइंडस्ट्रीतदेखील कार्यरत आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या मुलीविषयी...
नाटक, सिनेमा आणि मालिका यांमधून आनंद अभ्यंकर यांनी केलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अभ्यंकर यांनी काम केलेल्या 'असंभव', 'मला सासू हवी' या मालिका गाजल्या होत्या. 'मला सासू हवी' ही त्यांची शेवटची मालिका ठरली. याच मालिकेचं चित्रीकरण संपवून पुण्याला परत जात असताना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आनंद अभ्यंकर आणि त्यांच्याबरोबर असलेले आनंद पेंडसे या दोघांचं निधन झालं. आनंद अभ्यंकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका अभ्यंकर हिनेसुद्धा स्वत:च्या कर्तृत्वावर आज मराठी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सानिकाने अनेक मालिका आणि चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शिका, लेखिका म्हणून काम केलाय. शिवाय २०१६ मध्ये छोट्या पडद्यावरील 'ढोलकीच्या तालावर' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सानिका स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. सानिका एक प्रोफेशनल कथक डान्सर देखील असून. २०२३ मध्ये त्यांनी शिंजीनी या नावाने कथक डान्स ऍकेडमी देखील सुरु केली आहे. २०१७ मध्ये सानिका प्रथमेश कुलकर्णी सोबत विवाहबंधनात अडकली. या दाम्पत्यानं एक गोंडस मुलगी देखील आहे.
वाचा: आपण सर्वजण आई-वडिलांच्या सेक्सचा...; कंडोमच्या जाहिरातींची खिल्ली उडवणाऱ्यांना अन्नू कपूरचं उत्तर
डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या अपघातात आनंद अभ्यंकर यांच्यासह अभिनेता अक्षय पेंडसेचे निधन झाले होते. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावानजीक दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अभ्यंकर यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली होती. या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष याचाही मृत्यू झाला होता. या भीषण अपघातात अक्षय पेंडसे यांचा जागीच मृत्यू झाला.
संबंधित बातम्या