Rituraj Singh Death: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता ऋतुराज सिंहचे निधन झाले आहे. वयाच्या ५९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ऋतुराज हे स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. ऋतुराज यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ही माहिती ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
वाचा: शुटिंग दरम्यान तेजश्री प्रधान डायलॉग विसरली अन्...; पुढे काय झाले पाहा मजेशीर व्हिडीओ
ऋतुराज यांच्या जवळच्या मित्राने टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देत सांगितले की, 'ऋतुराजचे कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्याला स्वादुपिंडाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो घरी देखील आला होता. पण छातीत दुखायला लागले आणि त्याचे कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले आहे.'
ऋतुराज यांनी १९९३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपनी बात’, ‘ज्योति’, ‘हिटलर दीदी’,'शपथ', ‘वॉरियर हाई’, ‘आहट और अदालत’, ‘दीया और बाती हम’ या मालिकांमध्ये भूमिका साकारली होती. तसेच ‘आशिकी’, ‘मेरी आवाज ही पहचान है’, ‘तडप’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘सत्यमेव जयते’ या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
संबंधित बातम्या