Divya Khosla-Bhushan Kumar Separation Rumors: टी-सीरीज कंपनीचे मालकीण आणि भूषण कुमारची पत्नी अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दिव्या आणि भूषण यांच्या नात्यात सध्या कुरबुरी सुरू असून, ते दोघे लवकरच वेगळे होणार आहे. यात असाही दावा करण्यात आला आहे की, दोघांच्या नात्यामध्ये तेढ निर्माण झाले आहेत. एका रेडिट पोस्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. आता या चर्चेनंतर आता खुद्द अभिनेत्रीनेच सत्य सांगत मोठा खुलासा केला आहे. दिव्या खोसला कुमार आपले वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवते. पण, ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
रेडिटवर एका पोस्टद्वारे दिव्या खोसला कुमार आणि भूषण कुमार यांच्या नात्यात काही दुरावा आल्याचे म्हणण्यात आले आहे. युजरने अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम आयडीचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात दिव्या खोसला कुमार हिने आपल्या नावातून पती भूषण कुमार यांचे आडनाव म्हणजेच 'कुमार' हे नाव काढून टाकले आहे. यामुळेच अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.
या पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्री दिव्या कुमार हिने तिच्या इन्स्टाग्राम बायोमधून तिच्या पतीचे आडनाव 'कुमार' काढून टाकले आहे. तर, अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पती भूषण कुमारची कंपनी टी-सीरीज आणि पेहले म्युझिक लेबल यांना देखील अनफॉलो केले आहे. रेडिटवर शेअर केलेल्या पोस्टमधून असे विचारण्यात आले आहे की, 'दिव्या खोसला आता दिव्या खोसला कुमार का नाही? दिव्या खोसला आणि भूषण कुमार घटस्फोट घेणार आहेत का?’
दिव्याबद्दल ही पोस्ट सोशल मीडियावर येताच एकच खळबळ उडाली. दिव्या खोसला कुमार आणि भूषण कुमार यांच्या नात्यात खरंच दुरावा निर्माण झाला आहे का? हे जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता होती. मात्र, या अफवांना पूर्णविराम देत, अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांच्या प्रवक्त्याने म्हटले की, केवळ ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिष्याच्या सल्ल्यानेच दिव्याने नावामधून आडनाव काढून काढले आहे.
दिव्या खोसला कुमार या बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत्रींपैकी एक आहे. अखेर ती 'यारियाँ २' या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली होती. नितळ सौंदर्यामुळे दिव्या अनेकदा चर्चेत असते. याशिवाय अभिनेत्री तिचा पती भूषण कुमार याच्यावरील प्रेम अगदी जाहीरपणे व्यक्त करत असते. दरम्यान, त्यांच्या मतभेदाची बातमी ऐकून चाहत्यांना देखील धक्का बसला होता.