Actress Break Up For Weird Reason : बॉलिवूडमध्ये ब्रेकअप होण्याचे प्रकार तसे नवे नाहीत. अगदी काहीही कारणांनी कलाकार जोड्या एकमेकांपासून वेगळ्या होताना दिसतात. ब्रेकअपचं कारण अनेकदा फसवणूक, इतरांशी असलेले संबंध हे असतात. मात्र, आता एका अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपचे कारण सांगितले आहे, जे चर्चेत आले आहे. इतकंच नाही तर, अभिनेत्रीने याचं ब्रेकअपच्या कारणावर चित्रपट देखील बनवला आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
नुकतेच शुक्राना मोशन पिक्चर्सच्या 'मुत्र विसर्जन वर्जित है' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. या चित्रपटात जन्नत जुबेर, हितेन तेजवानी आणि कायनत अरोरासारखे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना अभिनेत्री कायनात अरोरा हिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
इन्स्टंट बॉलिवूडशी संवाद साधताना अभिनेत्री कायनात अरोरा म्हणाली की, चित्रपटात एक असा मुद्दा दाखवला जाईल, जो याआधी कधीच चित्रपटांमध्ये दाखवला गेला नाही. या चित्रपटात पुरुषांची सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्याची सवय दाखवण्यात येणार असून, असे करणे अत्यंत चुकीचे आहे आणि अजिबात करू नये, असे सांगण्यात येणार आहे. यादरम्यान अभिनेत्रीने सांगितले की, याच मुद्द्यावरून तिचे बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले आहे. कारण, त्याला देखील अशीच सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्याची सवय होती. इतकंच नाही तर, तो यानंतर हात देखील धुवायचा नाही. कायनात म्हणाली की, काही मुलांना आणि पुरुषांना हे अजिबात समजत नाही की, असे करणे खूप चुकीचे आहे. मी माझ्या बॉयफ्रेंडला अनेकदा समजावले. पण, त्याला सांगूनही कळत नव्हते. अखेर मलाच टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
अभिनेत्री कायनात अरोरा 'ग्रँड मस्ती' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने तिला ओळख दिली. परंतु त्यानंतर ती काही चित्रपटांमध्ये दिसली, ज्यात तिला फार प्रसिद्धी मिळाली नाही. कायनात अरोरा ही दिवंगत अभिनेत्री कायनात अरोरा हिची चुलत बहीण आहे. कायनातला आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात तिची हक्काची जागा निर्माण करण्यात यश आलेले नाही. आता ही अभिनेत्री आगामी 'मुत्र विसर्जन वर्जित है' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून एक हटके विषय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या