सध्या अनेक बड्या निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसतात. दिवसेंदिवस ओटीटी विश्व हे मोठे होत चालले आहे. अनेक बडे कलाकार, निर्माते ओटीटीवर पदार्पण करत आहेत. नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्राईम थ्रिलर वेब सीरिज लूटेरे प्रदर्शित झाली. या सीरिजचे हंसल मेहता यांचा मुलगा जय मेहताने दिग्दर्शन केले आहे. या सीरिजची बरीच चर्चा झाल्यानंतर आता या सीरिजमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'लुटेरी' सीरिजची कथा ही सोमालिया येथील दाखवण्यात आली आहे. या शहरातील बंदरावर मोठे राजकारण सुरु असते. तसेच या शहरातक समुद्री चाच्यांनी खळबळ उडवलेली असते. अशातच एका मोठ्या उद्योजकाचे एक जहाज बंदरात येणार असते. पण ते पोहोचण्यापूर्वीच काही दरोडेखोर जहाज हायजॅक करतात. या जहात एक असा कंटेनर असतो जो बंदरात लपवण्याचे नियोजन केलेले असते. त्यामागे मोठे राजकारण करण्यात येते. त्यासाठी विक्रांत गांधीला बंदर चालवण्याच्या समितीचे अध्यक्ष करण्यात येते. या कंटेनरसाठी विक्रांत काही गोष्टींचे आयोजन करुन ठेवतो. पण अचानक जहाज हायजॅक झाल्यामुळे प्रकरण चिघळते. अशा स्थितीत हे कंटेनर बंदरात पोहोचले तर प्रकरण टोकाला जाणार याची कल्पना कॅप्टनला येते. आता हे कंटेनर आणणाऱ्या जहाजाला थांबवण्यासाठी समुद्री चाच्यांची मदत घेतली जाते पण ते ते थांबवू शकतात का? तसेच समुद्री चाच्यांमध्ये आणि कॅप्टनमध्ये काय काय गोष्टी घडतात हे प्रेक्षकांना सीरिजच्या भागांमध्ये उलगत जाणार आहे.
वाचा: ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या लेकाला पाहिलेत का? डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल
या सीरिजची कथी अतिशय रंजक आहे. जय मेहताचा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. सीरिजच्या पहिल्याच भागात कथानक स्पष्ट होते. सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये ज्या प्रकारे सेट उभे करण्यात आले आहेत, ज्या प्रकारे शूट करण्यात आले आहे हे फार क्वचितच सीरिजमध्ये पाहायला मिळते. तसेच सीरिजमध्ये दाखवण्यात आलेले प्रत्येक पात्र हे त्याच्या भूमिकेला योग्य न्याय मिळवून देतो. अमृता खानविलकचा अभिनय पाहण्यासारखा आहे.
वाचा: अनंत अंबानी ते अभिषेक बच्चन; ‘हा’ आहे सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट
आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या दोन भागांनुसार लुटेरी ही सिरिज हंसल मेहता यांच्या हिट यादीमध्ये सहभागी होऊ शकते. तुम्हालाही क्राईम थ्रिलर सीरिज पाहायला आवडत असतील किंवा वॉटर लेव्हल क्राईम थ्रिलर म्हणा, तर तुम्हाला ही सीरिज तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकते.