Disha Patani on Karan Johar: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. लवकरच तिचा 'योद्धा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँचच्या वेळी दिशाने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दिशाने 'योद्धा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच या कार्यक्रमात करिअरमधील अनेक गोष्टी सांगितल्या. तिने करिअरच्या सुरुवातीला मॉडेलिंगच्या दिवसातील काही आठवणींना उजाळा दिला. ‘आज मी अभिनेत्री आहे, तर फक्त आणि फक्त करण जोहरमुळे… कारण माझ्या मॉडेलिंगच्या दिवसांत त्यांच्यावर लक्ष दिले. तेव्हा मी फक्त १८ वर्षांची होते. जर करणने मला संधी दिली नसती तर, मी इंडस्ट्रीमध्ये नसती…’ असे दिशा म्हणाली.
वाचा: धर्मेंद्र यांनी पहाटे शिळी पोळी खाल्ली! पोस्ट झाली व्हायरल, चाहते पडले काळजीत
पुढे ती म्हणाली, ‘लोकं कायम करणवर आरोप करत असतात. मी बाहेरुन आलेली व्यक्ती आहे. पण करणने मला संधी दिली..’ दिशाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत सिद्धार्थ मल्होत्राने करणला मिठी मारली आणि ‘आय लव्ह यू’ म्हणाला. सिद्धार्थ म्हणाला, ‘दिशा बरोबर बोलत आहे…’ सध्या सर्वत्र करण जोहर याची चर्चा रंगली आहे.
वाचा: ‘भिडे मास्तरां’ची लेक लग्न बंधनात अडकणार; झील मेहताच्या विवाह सोहळ्याची झाली सुरुवात!
दिशा हिने देखील २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एमएस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ सिनेमात सहाय्यक भूमिकेत दिसली होती. आज दिशाला कोणत्या ओळखीची गरज नाही. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. लवकरच तिचा 'योद्धा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा: सुभेदारांच्या घरात येणार नवं वादळ; महिपत शिखरे रचणार नवा डाव! पुढे काय होणार?
‘जी लोकं आरोप करतात की आम्ही फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम करतो, तर शशांक खेतान आउटसाईडर आहेत. ‘योद्धा’ सिनेमाचे दिग्दर्श सागर आणि पुष्कर देखील आउटसाईडर कालाकारांचं प्रतिनिथित्व करतात. योद्धा सिनेमाचा लिड अभिनेता आउटसाईडर आहे…’ असे एका कार्यक्रमात करण म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्याची चर्चा रंगली होती.
संबंधित बातम्या