मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार

दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 10, 2024 11:11 AM IST

पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘ये रे ये रे पैसा’ची धमाल पाहायला मिळणार असून, दिवाळीत पैशांची बरसात होणार, असे प्रेक्षक म्हणत आहेत.

दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार
दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार

धमाल कॉमेडी आणि मॅडनेस असलेल्या ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर ‘ये रे ये रे पैसा २’ या नावानं आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेललाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलंय. आता हेच बघता दिग्दर्शक संजय जाधव यांनी ‘ये रे ये रे पैसा ३’ प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याची घोषणा केली आहे. येत्या दिवाळीमध्ये म्हणजेच १ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल रसिक प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार!

पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ असं काहीसं भन्नाट कथानक या पूर्वीच्या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळाले होते. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता ‘ये रे ये रे पैसा ३’मध्ये आणखी काय वेगळी कथा दाखवली जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले अशी भली मोठी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. उत्तम कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार असल्यानं हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार यात काहीच शंका नाही.

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

प्रेक्षकांनाही लागली उत्सुकता

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, कुमार मंगत पाठक, ओमप्रकाश भट्ट, नासिर शरीफ यांनी ‘ये रे ये रे पैसा ३’ या आगामी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संभाळली आहे. तर, निनाद नंदकुमार बत्तीन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘ये रे ये रे पैसा ३’ या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांचीच आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे.

पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘ये रे ये रे पैसा’ची धमाल पाहायला मिळणार असून, दिवाळीत पैशांची बरसात होणार, असे प्रेक्षक म्हणत आहेत. सगळ्यांनाच आता या चित्रपटाची आतुरता लागून राहिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग