मराठी चित्रपटसृष्टीमधील महेश कोठारे हे नाव अतिशय लोकप्रिय आहे. त्यांनी ९०च्या दशकात मुलांची झोप उडवली होती. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला असे एकाहून एक जबरदस्त, खतरनाक खलनायक दिले की अनेक लहान मुलांची झोप उडाली होती. त्यामधील जर प्रेक्षकांवर कुणाची सर्वात जास्त दहशत असेल तर ती म्हणजे तात्या विचूंची. आता हा तात्या विंचू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले आहे.
एसटीच्या पाठीमागे लटकून प्रवास करणारा तात्या विंचू पाहिला की आजही लहान मुलांना धडकी भरते. तो आता आपल्याच घरी येणार की काय अशी भीती त्यांना वाटते. तिच भीती कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा तात्या विंचू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश कोठारे यांनी 'झपाटलेला ३'ची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
वाचा: अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट कसा आहे? थिएटरमध्ये जाण्यापूर्वी रिव्ह्यू नक्की वाचा
राजश्री मराठी या इन्स्टाग्राम अकाऊंटवर झपाटलेला चित्रपटाविषयी माहिती देण्यात आली आहे. महेश कोठारे आणि तात्या विंचू यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत, 'दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केली झपाटलेला ३ या चित्रपटाची घोषणा केली आहे. धडकी भरवणारा थरार तिसऱ्या भागातही पाहायला मिळणार' या आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
वाचा: 'स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण', गुढीपाडव्यानिमित्त माधुरी दीक्षितने शेअर केला मराठमोळा अंदाजातील व्हिडीओ
सोशल मीडियावर 'झपाटलेला ३' या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर चाहते दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत भावूक झाले आहेत. एका यूजरने 'माफ करा, पण मला जुन्या लक्ष्मा मामा असलेलाच चित्रपट पाहायला आवडतो' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'आम्हाला लक्षाची आठवण येत आहे' अशी भावनिक कमेंट केली आहे. तर तिसऱ्या एका यूजरने 'अभिनय बेर्डेला घ्या' असा सल्ला महेश कोठारे यांना दिला आहे. चौथ्या एका यूजरने, 'झपाटलेला चे किती पण पार्ट बनवा पण लक्षा मामा शिवाय मज्जा नाही' अशी कमेंट केली आहे.
वाचा: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी
महेश कोठारे यांनी जेव्हा 'झपाटलेला २' हा चित्रपट आणला तेव्हा त्यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांनी हिरमोड झाल्याची भावना देखील व्यक्त केली होती. आता 'झपाटलेला ३'मध्ये कोण दिसणार? कथा काय असणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत.
संबंधित बातम्या