सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे. ही पोस्ट एका नोकरीसंदर्भात आहे. पण या नोकरीसाठी मराठी उमेदवारांनी अर्ज करु नये असे स्पष्ट लिहिण्यात आले आहे. बरं या नोकरीचे ठिकाण मुंबईतील गिरगाव आहे. गिरगाव हे ठिकाण आजपर्यंत चाळसंस्कृती, सणसंस्कृती जपणाऱ्या मराठी माणसांचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागात एका कंपनीला नोकरीसाठी मराठी माणूस नको असे म्हटले गेले आहे. या कंपनीची ही पोस्ट मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडिकरने शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
एका कंपनीमध्ये गिरगाव येथे काम करण्यासाठी एक उमेदवार हवा होता. पण त्यासाठी अर्ज करताना मराठी उमेदवार नको असे स्पष्ट लिहिण्यात आले होते. ही पोस्ट दिग्दर्शक अक्षय इंडिकरने शेअर करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. कंपनीला त्यांची घोडचुक लक्षात आली. त्यानंतर तातडीने कंपनीने ही पोस्ट डिलिट केली. अक्षयने या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये मनसे पक्षाला टॅग केले आहे. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काय भूमिका असणार हे येत्या काळात कळणार आहे.
वाचा: 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या
अक्षयने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एका कंपनीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये गिरगाव येथील एका कंपनीला त्यांच्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये मराठी माणूस नको आहे असे स्पष्ट लिहिण्यात आले आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत त्याने 'मुंबईत मराठी माणूस चालणार नाही हे जाहीर लिहणारी माणसं? मराठी माणसांना मत मागणाऱ्या सगळ्या पक्षाकडून जबरी दखल घेण्याची अपेक्षा... तरीही नागरिक म्हणून आपण खपवून घेतोय? एवढा तिरस्कार? शेअर करा आणि योग्य ती दखल घ्यायला भाग पाडा' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: ‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका
एका कंपनीने लिंक्डिन या अॅपवर एक जाहिरात केली होती. एचआर जान्हवी सरानाने कंपनी तर्फे ही जाहिरात या अॅपवर टाकली आहे. यामध्ये मुंबईत त्यांना ग्राफिक डिझायनर हवा असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये त्यांनी कामाचे ठिकाण हे मराठीबहुल वस्ती असलेले गिरगाव सांगितले आहे. पण या नोकरीसाठी मराठी नोकरदाराने अर्ज करु नये असे स्पष्ट केले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. काही वेळातच कंपनीने ही पोस्ट डिलिट केली आणि एचआरने माफी मागितली आहे.
वाचा: 'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल
संबंधित बातम्या