'स्त्री २'साठी पुन्हा श्रद्धा कपूरची निवड? आता उलगडणार भूतकाळातलं पान-dinesh vijan fixed shraddha kapoor for stree prequel stree 2 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'स्त्री २'साठी पुन्हा श्रद्धा कपूरची निवड? आता उलगडणार भूतकाळातलं पान

'स्त्री २'साठी पुन्हा श्रद्धा कपूरची निवड? आता उलगडणार भूतकाळातलं पान

Payal Shekhar Naik HT Marathi
Jun 20, 2022 08:06 PM IST

२०१८ साली आलेल्या 'स्त्री' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटात श्रद्धासोबत राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका होती.

<p>स्त्री २</p>
<p>स्त्री २</p>

बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या 'स्त्री' (stree) चित्रपटानंतर आता याचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर आधारलेल्या 'स्त्री' चित्रपटाने प्रेक्षकांना बांधून ठेवलं होतं. कलाकार, कथा, संवाद अन गाणी सगळंच अप्रतिम असल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान आता 'स्त्री २' च्या निर्मितीचा विचार करत आहेत. या चित्रपटासाठी अभिनेत्रीची देखील निवड करण्यात आली आहे. पहिल्या चित्रपटाप्रमाणे यामध्येही अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha kapoor) स्त्री च्या भूमिकेत दिसणार आहे.

२०१८ साली आलेल्या 'स्त्री' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटात श्रद्धासोबत राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट हिट ठरल्यानंतर निर्माते याच्या प्रीक्वल करण्याच्या विचारात होते मात्र त्यापूर्वी त्यांनी 'रुही' आणि 'भेडिया' ची निर्मिती केली. आता पुन्हा एकदा ते 'स्त्री २' कडे वळले आहेत. यात श्रद्धासोबत कोणते कलाकार असणार याचा खुलासा अजून झालेला नाही.

काय असेल 'स्त्री २' ची कथा?

'स्त्री' या चित्रपटात एका स्त्रीची कथा दाखवण्यात आली होती जी पुरुषांचं अपहरण करत होती. चित्रपटाच्या अखेरीस राजकुमार राव तिला मुक्ती देतो. शेवटच्या काही सीनमध्ये स्त्री परत येणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ती मुलगी नक्की स्त्री कशी बनते हे दाखवण्यात येणार आहे. तिच्यासोबत नक्की काय झालं होतं याचा खुलासा चित्रपटाच्या या भागात होणार आहे. श्रद्धा सध्या लव रंजन यांच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यासोबतच ती विशाल फ्युरिया यांच्या 'नागीन' चित्रपटातही दिसणार आहे.

विभाग