मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  राजेश खन्नासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून डिंपल कपाडीया 'या' अभिनेत्याला करत होत्या डेट

राजेश खन्नासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून डिंपल कपाडीया 'या' अभिनेत्याला करत होत्या डेट

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 08, 2024 08:59 AM IST

आज ८ जून रोजी डिंपल कपाडीया यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्यातील काही रंजक गोष्टी...

Dimple Kapadia: डिंपल कपाडीया अफेअर
Dimple Kapadia: डिंपल कपाडीया अफेअर

बॉबी या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. त्यांनी बॉलिवूडमधील एक काळ काजवला होता. त्यांचे 'बॉबी', 'सागर', 'रुदाली', आणि 'राम लखन' हे चित्रपट तुफान हिट ठरले होते. त्यांचा चाहता वर्ग सातासमुद्रापार पोहोचला होता. पण डिंपल यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या होत्या. या सगळ्यात डिंपल राजेश खन्नासोबत सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून एका बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. आज ८ जून रोजी डिंपल कपाडीया यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी...

ट्रेंडिंग न्यूज

डिंपल कपाडीया आणि राजेश खन्ना यांच्याविषयी

डिंपल कपाडिया यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले होते. सुरुवातीला ते दोघे आनंदाने एकत्र राहात होते. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी लग्नाच्या जवळपास १० वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डिंपल कपाडीया यांचे नाव बॉलिवूड अभिनेता सनी देओलशी जोडले गेले. डिंपल आणि बॉबी यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
वाचा: अमिताभ हे रेखासोबत काम करु शकतात का? जया बच्चन यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

अभिनेत्याच्या पत्नीने दिली होती धमकी

'अर्जुन', 'मंजिल-मंजिल', 'आग का गोला', 'गुनाह' आणि 'नरसिम्हा' अशी काही चित्रपटात सनी आणि डिंपलने एकत्र काम केले होते. पण त्यांच्या अफेअरच्या चर्चा जेव्हा सुरु झाल्या तेव्हा दोघेही विवाहित होते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसले होते. जेव्हा डिंपलची बहिण सिंपलचे निधन झाले तेव्हा सनी त्यांच्या घरी पोहोचला होता. त्याने डिंपलचे सांत्वन केले होते. ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना सनीला छोटे बाबा म्हणून आवाज देत असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. सनीला डिंपलशी लग्न करायचे होते. पण सनीची पत्नी पूजाने त्याला धमकी दिली होती, जर असे काही झाले तर मुलांना घेऊन लांब निघून जाईन. कुटुंब वाचवण्यासाठी सनीने लांब राहण्याचे ठरवले.
वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

२०१७मध्ये दोघे दिसले होते एकत्र

डिंपल आणि सनीने कुटुंबीयांसाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २०१७ साली मोनाकोमध्ये ते दोघे एकत्र असल्याचे दिसले होते. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये दोघे हातात हात धरुन बसल्याचे दिसत होते.
वाचा: कलाला कळाली आई-वडिलांची बिकट परिस्थिती, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

टी-२० वर्ल्डकप २०२४