बॉबी या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. त्यांनी 'बॉबी', 'सागर', 'रुदाली', आणि 'राम लखन' यांसारख्या चित्रपटात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली. आज ८ जून रोजी त्यांचा वाढदिवस आहे. डिंपल यांनी वयाची पासष्टी ओलांडली असली तरी त्या चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय आहेत. आज त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
डिंपल कपाडिया यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी लग्नाच्या १० वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डिंपल कपाडीया यांचे नाव अभिनेता बॉबी देओलशी जोडले गेले.
'अर्जुन', 'मंजिल-मंजिल', 'आग का गोला', 'गुनाह' आणि 'नरसिम्हा' या चित्रपटात सनी आणि डिंपलने एकत्र काम केले होते. पण त्यांच्या अफेअरच्या चर्चा जेव्हा सुरु झाल्या तेव्हा दोघेही विवाहित होते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसले होते. जेव्हा डिंपलची बहिण सिंपलचे निधन झाले तेव्हा सनी तेथे पोहोचला होता. त्याने डिंपलचे सांत्वन केले होते. ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना सनी छोटे बाबा म्हणून आवज देत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सनीला डिंपलशी लग्न करायचे होते. पण सनीची पत्नी पूजाने त्याला धमकी दिली होती, जर असे काही झाले तर मुलांना घेऊन लांब निघून जाईन. कुटुंब वाचवण्यासाठी सनीने लांब राहण्याचे ठरवले.
डिंपल आणि सनीने कुटुंबीयांसाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र २०१७ साली मोनाकोमध्ये ते दोघे एकत्र असल्याचे दिसले होते. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये दोघे हातात हात धरुन बसल्याचे दिसत होते.