बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोलचा १९९५ मध्ये आलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. अवघ्या ४० लाख रुपये खर्चकरून तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०२ कोटींचा व्यवसाय केला होता. आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटातील प्रत्येक सीन चाहत्यांना आजही आठवतो, पण तुम्हाला माहित आहे का की चित्रपटाचा क्लायमॅक्स शाहरुख खानने बदलला होता. त्यानंतर निर्मात्यांनी त्यात आणखी काही बदल केले. त्याचा परिणाम असा झाला की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला.
ज्याप्रमाणे अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींबाबत चित्रपटांमध्ये केलेला बदल चाहत्यांना आवडतो, त्याचप्रमाणे चित्रपटाच्या शेवटी शाहरुख खानची अॅक्शन लोकांना आवडली होती. डीडीएलजेच्या शेवटी असलेला अॅक्शन सीक्वेंस प्रत्यक्षात चित्रपटाच्या मूळ पटकथेचा भाग नव्हता, असे खुद्द शाहरुख खानने एका मुलाखतीत सांगितले होते. शाहरुख खान म्हणाला, 'यशजी आणि आदिला चित्रपटात कोणतीही अॅक्शन नको होती. ते सेटवर येणार होते आणि त्यांना यायला एक तास शिल्लक होता.
शाहरुख खानने सांगितले की, जेव्हा ते वाटेत होते तेव्हा मी भांडलो होतो. नंतर मी परमीतसोबत अॅक्शन सीन शूट केला होता. चित्रपटात हे सर्व होणार नाही म्हणून यशजी आणि आदित्य खूप रागावले होते पण शेवटी त्यांनी ते सीन चित्रपटात ठेवले. अशा तऱ्हेने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटात अशा अॅक्शन सीन्सचा समावेश करण्यात आला होता, ज्यांना खूप पसंती तर मिळालीच पण भरपूर वाहवाही मिळाली. पण त्यात आणखी एक मोठा बदल झाला जो शाहरुखने नव्हे तर आदित्य चोप्राने केला होता.
वाचा: पाहुण्या कालाकारांच्या भूमिकेत दिसले ४८ कलाकार, बॉक्स ऑफिसवर ठरला होता हिट! ओळखा पाहू
संगीतकार ललित पंडित यांनी चित्रपटाच्या अॅक्शन सीक्वेंसमध्ये त्यांच्या मते संगीत आणि ध्वनीचा वापर केला होता, पण आदित्यच्या सांगण्यावरून त्यांनी नंतर ढोल-ताशांच्या तालावर 'मेहंदी लगा के रखना' या गाण्याचे संगीत लावले. सुरुवातीला ललितला आदित्य काय करतोय असा प्रश्न पडला होता. पण नंतर त्यांना समजलं की दिग्दर्शकाला त्याच्या चित्रपटाबद्दल खात्री आहे. तसेच तो जो प्रयत्न करत आहे त्याला चांगले यश मिळेल अशी खात्री आली होती.