हजारों जवाबों से अच्छी मेरी खामोशी… दिलजीत दोसांझनं शेवटची कॉन्सर्ट केली मनमोहन सिंग यांना समर्पित!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हजारों जवाबों से अच्छी मेरी खामोशी… दिलजीत दोसांझनं शेवटची कॉन्सर्ट केली मनमोहन सिंग यांना समर्पित!

हजारों जवाबों से अच्छी मेरी खामोशी… दिलजीत दोसांझनं शेवटची कॉन्सर्ट केली मनमोहन सिंग यांना समर्पित!

Dec 30, 2024 10:32 AM IST

Diljit dosanjh : दिलजीत दोसांझ याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अनोख्या अंदाजात श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने आपली या दौऱ्याची शेवटची कॉन्सर्ट मनमोहन सिंग यांना समर्पित केली आहे.

diljit
diljit

Diljit Dosanjh Pays Tribute To Manmohan Singh : गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ अनेकदा त्याच्या लाईव्ह शोमध्ये असे काही तरी करतो, ज्यामुळे तो खास बनतो. अलीकडेच एका लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अभिनेता-गायकाने दीपिका पादुकोणचा उल्लेख केला होता. इतकंच नाही तर तिला स्टेजवर देखील बोलावलं. आता त्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्मरण करून श्रद्धांजली वाहिली आहे. दिलजीत आपल्या अभिनयाने आणि संगीताने जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याने आपल्या या अंदाजाने खरोखरच सर्वांची मने जिंकली आहेत.

दिलजीत दोसांझ याने त्याच्या ‘दिलुमिनाटी’ या शोच्या शेवटच्या लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान माजी पंतप्रधानांचे स्मरण केले आणि म्हटले की, ‘आजचा कार्यक्रम देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समर्पित आहे. ते अतिशय साधे जीवन जगत होते. राजकारणासारख्या या क्षेत्रात जे शक्य नाही,  ते त्यांनी करून दाखवले. त्यांनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही किंवा ते कधी उद्धट बोलले नाहीत. दिलजीत म्हणाला की,  त्यांनी ’हजारों जवाबों से मेरी खामोशी अच्छी…' म्हणत सगळ्यांनाच एक शिकवण दिली.  त्यांनी आजच्या पिढीला शिकण्याचा सल्ला दिला.

Diljit Dosanjh Concert: दिलजीतनं शब्द पाळला! बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर कॉन्सर्टमधून मद्य आणि मांसाहार गायब

दिलजीतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो स्टेजवर दिसत आहे. यावेळी तो म्हणतो की, 'आजची मैफल माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना समर्पित आहे. मनमोहन सिंग हे अतिशय साधे जीवन जगले. मी त्यांचा जीवनप्रवास पाहिला. त्यांनी इतके साधे जीवन जगले आहे की, त्यांच्याबद्दल कोणी वाईट बोलले तरी त्यांनी सूड उगवला नाही. मात्र, राजकारणातील करिअरमधील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी सोडून देणे.

डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन

डॉ. मनमोहन सिंग हे ९२ वर्षांचे होते आणि बराच काळ आजारी होते. २६ डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधानांच्या निधनानंतर चित्रपट, राजकारण आणि क्रीडा जगतातील दिग्गजांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांचे स्मरण केले.

तर, दिलजीत दोसांझ याने त्याच्या परफॉर्मन्सदरम्यान माजी पंतप्रधानांचे स्मरण करून जी श्रद्धांजली वाहिली, ते ऐकल्यानंतर सगळीकडूनच त्याचे कौतुक केले जात आहे. दिलजीतने लोकांचे मन जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने पाकिस्तानी अभिनेत्री हनिया आमिरसाठीही गाणे गायले होते. नुकतीच दीपिका पादुकोणही बेंगळुरूमध्ये त्याच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

Whats_app_banner