Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या गाण्यांवर ‘या’ राज्यातील सरकारने लावली बंदी! नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या गाण्यांवर ‘या’ राज्यातील सरकारने लावली बंदी! नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या गाण्यांवर ‘या’ राज्यातील सरकारने लावली बंदी! नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...

Nov 15, 2024 01:23 PM IST

Diljit Dosanjh Dil Luminati Concert :तेलंगणा सरकारने दिलजीत दोसांझला हैदराबादमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करण्यापूर्वी नोटीस पाठवली आहे. गायकाच्या मैफलीसाठी पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये काही अटी घालण्यात आल्या आहेत.

Diljit Dosanjh Dil Luminati Concert
Diljit Dosanjh Dil Luminati Concert (instagram)

Diljit Dosanjh Dil Luminati Concert : पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्ट शुक्रवारी हैदराबादमध्ये होणार आहे. त्याआधीही या गायकाची मैफल वादात सापडली आहे. वास्तविक, तेलंगणा सरकारने दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्ट आयोजकाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि काही अटी घातल्या आहेत. या नोटीसनुसार, दिलजीत दोसांझला दारू, ड्रग्ज आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे कोणतेही गाणे न गाण्याची सूचना देण्यात आली आहे. चंदीगडचे प्राध्यापक पंडितराव धर्नेवार यांनी दोसांझ यांना लाईव्ह शोमध्ये अशी गाणी गाण्यापासून रोखण्यासाठी तक्रार केल्यानंतर, ही नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटीसमध्ये काय म्हटले आहे?

रंगारेड्डी जिल्ह्यातील महिला आणि बालकल्याण, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण विभागाच्या जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांनी ७ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नोटीसनुसार, तक्रारदाराने व्हिडिओ पुरावा सादर केला होता, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ अशी गाणी गाताना दिसला होता. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये २६ आणि २७ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या कॉन्सर्ट दारू, ड्रग्स आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी गाणी वाजताना दाखवण्यात आली होती. या नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की, ‘तुम्हाला तुमच्या लाईव्ह शोमध्ये याचा प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही ही नोटीस आगाऊ जारी करत आहोत.’

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांजच्या हिरेजडीत घड्याळाची चर्चा, किंमत ऐकून विश्वास बसणार नाही

मुलांना स्टेजवर न बोलवण्याचे निर्देश

नोटीसमध्ये दिलजीतला त्याच्या कॉन्सर्टदरम्यान मुलांना स्टेजवर न बोलवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यात असेही म्हटले आहे की, ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रौढांनी १४० डेसिबलपेक्षा जास्त आवाज ऐकू नये. तर, लहान मुलांसाठी ही पातळी १२० डेसिबलपर्यंत कमी केली जाते. त्यामुळे लहान मुलांनी १४० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या दाबाच्या संपर्कात येऊ नये. त्यामुळे मुलांनी १४० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या संपर्कात येऊ नये.’

नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, ‘तुमच्या मैफिलीची मार्गदर्शक तत्त्वे १३ वर्षांखालील मुलांना यात येण्याची परवानगी असल्याचे सांगतात. मैफिलीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की, मैफिलीमध्ये मोठा आवाज आणि लेझर लाईट यांचा समावेश असू शकतो. या दोन्ही गोष्टी मुलांसाठी हानिकारक आहेत.’

केव्हा आहे दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट?

'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्ट शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता जीएमआर अरेना, एअरपोर्ट ऍप्रोच रोड, हैदराबाद येथे होणार आहे. गायक दिलजीत दोसांझ बुधवारी शहरात पोहोचला आणि सोशल मीडियावर त्याच्या शहर भटकंतीची झलकही शेअर केली. 

Whats_app_banner