सध्या सगळ्या तरुण पिठीला आपल्या सुमधून आवाजाने मंत्रमुग्ध करणारा पंजाबी गायक म्हणून दिलजीत दोसांज ओळखला जातो. दिलजीतचे प्रत्येक गाणे हे तुफान हिट होत असते. तसेच दिलजीतच्या कॉन्सर्टला हजेरी लावण्यासाठी लाखो चाहते गर्दी करतात. सध्या दिलजीत हा युरोप टूरवर आहे. तो परदेशातील चाहत्यांसाठी लाइव्ह गाणी गाताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर दिलजीतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिलजीच पाकिस्तानी चाहतीशी बोलताना दिसत आहे.
दिलजीत दोसांझ सध्या युरोप टूरवर असून चाहत्यांची मने जिंकत आहे. त्याच्या मँचेस्टर येथील एका कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी चाहतीने हजेरी लावली. या चाहतीला दिलजीतने शूज गिफ्ट केले आहेत. यासोबतच त्याने भारत-पाकिस्तानच्या जनतेला एक संदेशही दिला, ज्याचं कौतुक होत आहे. व्हिडीओमध्ये दिलजीत बोलताना दिसत आहे की,'भारत असो वा पाकिस्तान.. दोन्ही देश माझ्यासाठी समान आहेत.' सध्या सोशल मीडियावर दिलजीतचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिलजीत चाहतीशी बोलताना दिसत आहे. तो चाहतीला स्टेजवर बोलावतो आणि विचारतो, 'तू कुठून आली आहेस?' त्यावर ती चाहती उत्तर देते 'पाकिस्तान.' ते ऐकून दिलजीत म्हणतो, 'जोरदार टाळ्या. बघा, भारत आणि पाकिस्तान आमच्यासाठी सारखेच आहेत. पंजाबी लोकांच्या मनात प्रत्येकाविषयी प्रेम आहे. या सीमा राजकारण्यांनी निर्माण केल्या आहेत. जे पंजाबी बोलतात किंवा ज्यांना पंजाबी मातृबोली आवडते ते इकडे-तिकडे राहतात. पण माझ्यासाठी सर्वजण सारखेच आहेत. माझ्या भारत देशातून आलेल्यांचे ही स्वागत आहे आणि पाकिस्तानातून आलेल्यांचेही स्वागत आहे.'
वाचा: पतौडी शाही पॅलेस बनणार म्यूझियम? सैफ अली खानने सांगितले सत्य, वाचा…
दिलजीतच्या प्रत्येक डायलॉगवर प्रेक्षकांचा आवाज ऐकू येतो. मँचेस्टर टूरवर दिलजीतची आई आणि बहीणही उपस्थित होती. दिलजीतने त्याची ओळख करून दिली तेव्हा त्याची आई भावूक झाली. दिलजीत गर्दीत आई आणि बहिणीच्या पायाला हात लावतो. जेव्हा तो सांगतो की त्याचे कुटुंब तेथे उपस्थित आहे, तेव्हा जमाव जल्लोष करतो.