Diljit Dosanjh: मुंबईत होणार दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट, तिकिट कधी आणि कसे काढता येणार वाचा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Diljit Dosanjh: मुंबईत होणार दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट, तिकिट कधी आणि कसे काढता येणार वाचा

Diljit Dosanjh: मुंबईत होणार दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट, तिकिट कधी आणि कसे काढता येणार वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 20, 2024 02:45 PM IST

Diljit Dosanjh: पंजाबी गायक दिलजीत दोसांझने सोशल मीडिया पोस्टद्वारे मुंबईत होणाऱ्या कॉन्सर्टची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया कुठे आणि कधी काढता येणार कॉन्सर्टचे तिकिट...

Diljit Dosanjh
Diljit Dosanjh

पंजाबी गायक दिलजीत दोसांझ हा जगभरात लोकप्रिय आहे. त्याची गाणी तरुणांच्या मनावर राज्य करतात. सध्या दिलजीतचे जगभरात कॉन्सर्ट सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या प्रत्येक कॉन्सर्टला चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. आता जगभरात फिरल्यानंतर दिलजीतचा मुंबईत कॉन्सर्ट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिलजीतने स्वत: सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली आहे.

दिलजीतने बुधवारी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर नव्या शोची स्टोरी पोस्ट शेअर केली आहे. येत्या १९ डिसेंबरला तो मुंबईत परफॉर्म करणार आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, 'आम्ही तुमचं ऐकलं! मुंबई शोची घोषणा.' तसेच दिलजीतने मुंबईतील घोषणेचा फोटो पुन्हा शेअर करत, 'लाओ जी अखेर हो गया अॅड मुंबई' असे म्हटले आहे. त्यासोबतच दिलजीतने उत्साही असलेल्या महिलेचा फोटो देखील वापरला आहे. यापूर्वी गायकाने दिल्ली आणि जयपूरमध्येही आणखी शो होणार असल्याचे सांगितले आहे.

दिल-लुमिनाती टूर इंडियाबद्दल

अमेरिका, कॅनडा आणि युरोपचा दौरा केल्यानंतर दिलजीतने दिल-लुमिनाती टूर भारतात आणली आहे. दिल-लुमिनाती टूरने त्याला आंतरराष्ट्रीय आयकॉन म्हणून प्रस्थापित केले. त्याच्या भारत दौऱ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि काही मिनिटांतच त्याची तिकिटे विकली गेली. याविषयी बोलताना दिलजीत म्हणाला होता की, 'त्याच्या आगामी दिल-लुमिनाती इंडिया टूर २०२४ ला मिळालेल्या प्रतिसादामुळे मी भारावून गेलो होतो. जो २.५ लाख तिकिटांच्या विक्रीसह भारतातील आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा कॉन्सर्ट टूर ठरला होता.'

 

His Insta story.
His Insta story.

दौऱ्याबद्दल अधिक माहिती

६ ऑक्टोबरपासून दिल्लीत भारतीय टप्प्याला सुरुवात झाली. हैदराबाद आणि अहमदाबाद येथेही दिलजीतचे कॉन्सर्ट होणार आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनने गायक दिलजीत दोसांझच्या अहमदाबादमध्ये झालेल्या कॉन्सर्टला नुकतीच हजेरी लावली होती. त्या दोघांचा स्टेजवरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वाचा: ८ अफेअर्स, ३ लग्न करुनही आज आहे एकटी, पतीच्या अंत्यसंस्काराला गेली नाही झीनत अमान

अहमदाबाद पाठोपाठ दिलजीत २२ नोव्हेंबरला लखनौमध्ये आपल्या दिल-लुमिनाती टूरअंतर्गत परफॉर्म करणार आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबरला पुणे, ३० नोव्हेंबरला कोलकाता, ६ डिसेंबरला बेंगळुरू, ८ डिसेंबरला इंदूर आणि १४ डिसेंबरला चंदीगडला कार्यक्रम सादर करणार आहे. २९ डिसेंबर रोजी गुवाहाटी येथे तो या संगीत दौऱ्याचा समारोप करणार आहे.

Whats_app_banner