Dilip Kumar Death Anniversary: दिवंगत बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार हे अशा कलाकारांपैकी एक आहेत, जे आता या जगात नसतील, पण त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याने २०२१साली वयाच्या ९८व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. आज ७ जुलैला त्यांचा स्मृतिदिन आहे. अभिनेते दिलीप कुमार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत होते. मात्र, तरीही त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आजही अनेकांना माहीत नाहीत.
दिलीप कुमार यांनी त्यांच्या 'द सबस्टन्स अँड द शॅडो' या आत्मचरित्रात वडिलांशी भांडण झाल्यानंतर कामाच्या शोधात पुण्याला गेल्याचे नमूद केले आहे. पुण्यात त्यांनी दीर्घकाळ मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर्स क्लबमध्ये मॅनेजर म्हणून काम केले. दिलीप कुमार यांनी कॅन्टीनमध्ये बनवलेले सँडविच लोकांना खूप आवडायचे. एकदा भाषण देताना ते म्हणाले होते की, भारताचा ब्रिटिशांविरुद्धचा लढा अगदी योग्य होता. ब्रिटिश राज्यकर्ते चुकीचे आहेत. त्यामुळे संतप्त होऊन इंग्रजांनी त्यांची येरवडा तुरुंगात रवानगी केली होती.
दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. दिलीप कुमार जेव्हा अभिनय शिकत होते, तेव्हा बॉम्बे टॉकीजच्या मालकीण देविका राणी यांनी त्यांना चित्रपटात लाँच करायची जबाबदारी हाती घेतली होती. मात्र, अभिनय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी देविका राणी यांना त्यांनी युसूफ खान यांना नाव बदलून 'दिलीप कुमार' करण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांना दिलीप कुमार या नावाने ओळख मिळू लागली.
दिलीप कुमारची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे. त्यांनी आपल्या निम्म्या वयाच्या अभिनेत्रीशी लग्न केले. १७४७मध्ये दिलीप कुमार यांचा 'जुगनू' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो प्रचंड गाजला होता. या चित्रपटानंतर दिलीप कुमार यांना पती बनवण्याचे प्रत्येक मुलीचे स्वप्न होते. त्यापैकी एक म्हणजे सायरा बानू, ज्यांना वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी दिलीप कुमारशी लग्न करायचे होते. त्यांचे स्वप्न दिलीप कुमार यांनी पूर्ण केले. दोघांचे लग्न झाले, तेव्हा सायरा बानू अवघ्या २२ वर्षांच्या होत्या, तर दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते.
दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग का म्हणतात, यामागे एक कथा आहे. एक काळ असा होता, जेव्हा दिलीप कुमार यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक गंभीर आणि दुःखद भूमिका साकारल्या होत्या. येथूनच त्यांना ‘ट्रॅजेडी किंग’ ही पदवी मिळाली होती.
संबंधित बातम्या