Shivrayancha Chhava: वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात!; 'शिवरायांचा छावा'चा फर्स्ट लूक पाहिलात का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivrayancha Chhava: वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात!; 'शिवरायांचा छावा'चा फर्स्ट लूक पाहिलात का?

Shivrayancha Chhava: वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात!; 'शिवरायांचा छावा'चा फर्स्ट लूक पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Dec 19, 2023 12:36 PM IST

Digpal Lanjekar: 'शिवरायांचा छावा' हा चित्रपट नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

Shivrayancha Chhava
Shivrayancha Chhava

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे अवघे आयुष्य एक धगधगते अग्निकुंड म्हणावे लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचलले आहे. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे.

तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे. तत्पूर्वी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
वाचा: 'थ्री इडियट्स'मधील चतूरचे मराठीत पदार्पण, 'आईच्या गावात मराठीत बोल' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत

दिग्पाल लांजेकरने अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'शिवरायांचा छावा' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टवर संभाजी महाराज हे वाघा समोर उभे असल्याचे दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत त्याने 'वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात... ‘शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!' असे कॅप्शन दिले आहे.

'शिवरायांचा छावा' नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

Whats_app_banner