Muktaai : ठरलं! 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट, पाहा टीझर-digpal lanjekar upcoming movie muktaai teaser is out ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Muktaai : ठरलं! 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट, पाहा टीझर

Muktaai : ठरलं! 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट, पाहा टीझर

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 19, 2024 01:18 PM IST

Muktaai Movie: गेल्या काही दिवसांपासून 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

Muktaai
Muktaai

पंचांगानुसार रक्षाबंधन आज म्हणजेच १९ ऑगस्ट आहे. हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आणि प्रगतीसाठी ती श्री हरीकडे प्रार्थना करते. रक्षाबंधन हा भावाबहिणीतील नात्याचा बंध अधिक दृढ करण्याचा सण. आई वडीलांच्या देहत्यागानंतर मुक्ताईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. यावर आधारित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे,.

वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने दटावले देखील. या निवृत्ती महाराज, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई या भावंडांचे नाते अतिशय आदर्शवत, सुंदर असेच होते. या चारही भावंडांच्या चरित्रात पावलो पावली बहिण भावाच्या पवित्र नात्याचा प्रत्यय देणारे प्रसंग दिसतात. प्रत्येक प्रसंगात मुक्ताई आणि तिचे तीनही भाऊ एकमेकांना सांभाळताना, जपताना दिसतात. उदाहरणार्थ मुक्ताईच्या अपमानामुळे व्यथित न होता तुच्या शब्दाचे रक्षण करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीची लाही लाही करून घेऊन मांडे भाजले.

गावात होणाऱ्या अपमानामुळे दुःखी झालेल्या ज्ञानेश्वरांना ताटी उघडायला लावून ज्ञानेश्वरी लिहायला प्रेरणा मुक्ताईने दिली. हीच कथा वेळोवेळी मुक्ताई ला अध्यात्मिक बाबतीत महत्त्व देणाऱ्या तिच्या गुरुबंधूंच्या निवृत्तीनाथांच्या बाबतीत पहायला मिळते. संत ज्ञानेश्वरांचे आणि मुक्ताईचे नाते तर कोणत्याही काळाच्या पलीकडचे, लोभसवाणे असलेले दिसते. याच विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या निरागस, निष्पाप आणि पवित्र नात्याचा उलगडा दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात होताना आपल्याला दिसणार आहे.

कधी होणार चित्रपट प्रदर्शित?

माउली ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई या भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचा बंध उलगडणारे आकर्षक पोस्टर रक्षाबंधनाच्या मंगल दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट नववर्षारंभी ३ जानेवारी २०२५ ला आपल्या भेटीला येतोय.
वाचा: कल्की २८९८ एडी 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार

कोणते कलाकार दिसणार?

चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी, निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहे. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे.

विभाग