मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने केली नव्या चित्रपटाची घोषणा

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने केली नव्या चित्रपटाची घोषणा

Aarti Vilas Borade HT Marathi
May 31, 2024 11:09 AM IST

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे ऐतिहासिक चित्रपटांसाठी विशेष ओळखले जातात. आता त्यांनी संत मुक्ताई यांच्यावर चित्रपट करणार असल्याची घोषणा केली आहे.

sant gyaneshwaranchi muktai: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने चित्रपट
sant gyaneshwaranchi muktai: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने चित्रपट

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांना विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते. पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला देहदंड स्वीकारावा लागला. मातापित्याच्या देहत्यागानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही मुक्ताबाईंवर पडली होती. तिने आईच्या निसर्गदत्त भावनेने ती पेलली. त्यांचा हा संपूर्ण प्रवास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर रुपेरी पडद्यावर दाखवणार आहेत. त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिग्पाल लांजेकरने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. मुक्ताबाईंचे साधेपण अर्थपूर्ण विचार आपल्याला आजही विचार करायला भाग पाडतात आणि स्त्री मुक्तीची वेगळीच जाणीव निर्माण करत प्रेरणाही देतात. अशा संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: 'इंडियाज बेस्ट डान्सर ४'साठी ऑडिशन द्यायची आहे? मग जाणून घ्या कधी आणि कुठे होणार

चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अलौकिक भावंडांच्या भूमिकेत नेमकं कोण असणार? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका पोस्टरमधून लहानपणीच्या ‘मुक्ताई’ आणि ‘ज्ञानेश्वर’ यांची चैतन्यमय झलक पहायला मिळते आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टर मध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि गोडुल्या मुक्ताच्या भूमिकेत चिमुकली ईश्मिता जोशी दिसत आहे.
Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे 'आवेशम' सिनेमाची कथा

काय असणार चित्रपटाची कथा?

मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेचे सिद्ध जीवन होते. छोट्या आयुष्यात या जगन्मायेने संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. ‘मुक्ताई’ने निभावलेल्या माता ,भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहेत. मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचे नाते विलक्षण होते. मुक्ताई ज्ञानेश्वरांची कधी माता बनायची, कधी बहीण, तर कधी शिष्या बनायची. ज्ञानेश्वरांना गुरु मानून मुक्ताईने त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात केले, तर प्रसंगी तिने ज्ञानेश्वरांना उपदेशही केला. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई।।’ असे वर्णन केले आहे.
वाचा: अमोलमुळे अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत मोठा ट्विस्ट

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग