Katrina Kaif House: बेडरुमपासून ते बाल्कनीपर्यंत; अभिनेत्री कतरिना कैफचे घर आतुन पाहिलेत का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Katrina Kaif House: बेडरुमपासून ते बाल्कनीपर्यंत; अभिनेत्री कतरिना कैफचे घर आतुन पाहिलेत का?

Katrina Kaif House: बेडरुमपासून ते बाल्कनीपर्यंत; अभिनेत्री कतरिना कैफचे घर आतुन पाहिलेत का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 07, 2024 06:50 PM IST

Katrina Kaif House: कतरिना कैफ केरळमध्ये एका कार्यक्रमासाठी जात असताना तिच्या हेअर स्टायलिस्टने घरातच तयारी केली. तयारी करत असताना कतरिनाच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.

Katrina Kaif House
Katrina Kaif House

बॉलिवूड स्टार्सचं घर आतून कसं दिसतं या प्रश्नाचं उत्तर अनेक चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. थेट नव्हे, तर अधूनमधून बहाण्याने त्यांना आपल्या आवडत्या स्टार्सच्या घराची एक झलक पाहायला मिळते. अभिनेत्री कतरिना कैफच्या चाहत्यांनाही अशी संधी मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर कतरिनाच्या घरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिनाच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.

कतरिनाच्या घरातील व्हिडीओ व्हायरल

कतरिना कैफ नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोचीला गेली होती. तेथे सर्वजण कतरिनाच्या लूकच्या प्रेमात पडले होते. आता तिचे हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना घराबाहेर पडण्यापूर्वी तयार होतानाची झलक दिसत आहे. त्यासोबतच कतरिनाचे संपूर्ण घर दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये कतरिना कैफ पिंक कलरच्या साडीत दिसत आहे. तिने आपल्या घराच्या बाल्कनीत उभे राहून फोटो काढले आणि बाल्कनीत शोभेसाठी ठेवलेल्या झाडांसोबत पोझ दिली. तसेच उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी तिने बाल्कनीमध्ये पांढरा रंगाचे कापड लावले आहे. तसेच व्हिडीओच्या सुरुवातीली कतरिनाच्या घरातील झलक दिसत आहे. वूडन फ्लोअरिंग, बसायला पिवळ्या रंगाचा सोफा त्याच्या मागच्या बाजूला डायनिंग एरिया दिसत आहे. या डायनिंग एरियाच्या एका भींतीला पांढरा रंग देण्यात आला आहे. तसेच पिवळ्या रंगाच्या लाईट्स दिसत आहेत. कतरिनाने घरात सुंदर अशी सजावट केल्याचे दिसत आहे.

कसे आहे कतरिनाचे घर

दिवाणखान्याच्या मुख्य भिंतींना अप्रतिम पोत देण्यात आली असून डायनिंग टेबलच्या वर लावण्यात आलेल्या झाडांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. एकंदरीत कतरिनाचे घर अतिशय आकर्षक दिसत आहे. बिल्डींगच्या सर्वात वरच्या मजल्यावर कतरिना राहात असल्याचे म्हटले जात आहे.कतरिना कैफ केरळमधील कोची येथे नवरात्रीनिमित्त कल्याणराम कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. फॅमिली वेल्फेअर ज्वेलरीचे ते मालक आहेत. क्रिती सेनन, शिल्पा शेट्टी आणि इतर स्टार्सही याच इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते.

वाचा: बॉलिवूडमध्ये १९८०साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे झाले होते रेल्वेचे नुकसान, चित्रपटही ठरला फ्लॉप

कतरिना कैफने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले आहे. दोघेही क्वचितच आपल्या घराचे फोटो शेअर करतात. याआधी विकी कौशलने कतरिना कैफच्या ब्रँड प्रॉडक्ट्सबद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता. या दोघांनी 2021 साली प्रेमविवाह केला होता, पण त्याआधी हे बॉलिवूड कपल बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी कधीही मोठ्या पडद्यावर एकत्र काम केलेले नाही. कतरिना शेवटची मेरी ख्रिसमस या चित्रपटात दिसली होती.

Whats_app_banner