सध्या संगीत विश्वात दु:खाचे वातावरण आहे. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. आपल्या संगीताच्या जादूने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणारे झाकीर हुसेन यांचे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात निधन झाले. झाकीर हुसैन यांनी जवळपास सहा दशकांच्या कारकिर्दीत अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावले आहेत. सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकणाऱ्या झाकीर हुसैन यांनी एका बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.
उस्ताद झाकीर हुसेन यांनी आपल्या कारकिर्दीत १२ चित्रपटांमध्ये काम केले होते. १९८३ मध्ये त्यांनी शशी कपूर यांच्यासोबत 'हीट अँड डस्ट' या ब्रिटिश चित्रपटात काम केले. या चित्रपटाद्वारे झाकीर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. झाकीर यांच्या चाहत्यांनाही या चित्रपटात त्याचे अभिनय कौशल्य पाहायला मिळाले. या चित्रपटाने त्या काळी चांगली कमाई देखील केली होती.
पहिला चित्रपटाला मिळालेले यश पाहून झाकीर यांनी पुन्हा १९९८मध्ये दुसरा सिनेमा साईन केला. या चित्रपटाचे नाव होते 'साज.' या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. तसेच त्या दोघांचे काही रोमँटिक सीन दिले आहेत. या शिवाय ते द परफेक्ट मर्डर (१९८८), थंडुविटेन एनई (१९९१ तमिळ चित्रपट, कॅमियो रोल), मिस बीटीज चिल्ड्रन (१९९२), झाकीर अँड हिज फ्रेंड्स (१९९८), टो (२०१८), मंकी मॅन (२०२४) अशा १२ चित्रपटांमध्ये दिसले होते.
वाचा: माहिती आहे का राज कपूर यांनी केले आहे 'या' मराठी सिनेमामध्ये काम, अशोक सराफ होते मुख्य भूमिकेत
झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट शूट केला होता. तबल्यावर एका लहान मुलाची जादुई कलात्मकता पाहून सगळेच थक्क झाले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 2016 साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एक ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट आयोजित केला होता, ज्यात झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार होते. केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी हा सन्मान होता.
संबंधित बातम्या