Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणदेखील पोहोचली होती. दीपिका लवकरच पहिल्या मुलाची आई होणार आहे. ती आता सात महिन्यांची गरोदर आहे. दीपिकाव्यतिरिक्त तिचा पती रणवीर सिंगदेखील या ग्रँड वेडिंगला पोहोचला आणि इतर सेलिब्रिटींसोबत डान्स करताना दिसत होता. दरम्यान, दीपिका पादूकोणने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या ड्रेसची किंमत किती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अनंत अंबानीच्या लग्नासाठी दीपिकाने लाल रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. तिच्या या ड्रेसने सर्वांची मने जिंकली आहेत. लाल रंगाच्या अनारकलीमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपिकाने काही फोटो शेअर केले आहेत. दीपिकाचा पारंपरिक पोशाख तोराणी यांनी डिझाइन केला होता. त्याचबरोबर दीपिकाच्या ड्रेसची किंमत कळली तर तुम्हाला धक्काच बसेल. दीपिकाने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत जवळपास १ लाख ४५ हजार ५०० रुपये आहे. दीपिका प्रमाणे ऐश्वर्या रायने देखील लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसची किंमत किती याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, दोन्ही अभिनेत्रींच्या ड्रेसवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने दीपिका पादूकोणचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती ट्रेडिशनल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती लग्नाच्या मांडवात प्रवेश करताना दिसत आहे. तसेच या लाल रंगाच्या ड्रेसवर दीपिकाने गळ्यात सुंदर असा नेकलेस घातला आहे. अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा अतिशय भन्नाट होता. यात देश-विदेशातील नामवंतांनी हजेरी लावली होती. या लग्नात बॉलिवूड स्टार्स, विविध पक्षांचे राजकारणी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर पाहुणे आले होते.
वाचा: Bigg Boss OTT 2 चा विजेता एल्विश यादव ईडीची नोटीस, सापाचे विष वापरल्यामुळे होणार चौकशी
लग्नाच्या दोन दिवस आधी राधिका मर्चंटचा संगीत सोहळाही होता. यात दीपिका आणि रणवीर सिंगसह सर्व सेलिब्रिटी पोहोचले होते. ओरीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपिकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात ओरी अभिनेत्रीच्या बेबी बंपवर हात ठेवताना दिसत होता. त्याचवेळी रणवीर सिंगही ओरी आणि दीपिकासोबत उभा राहून फोटो काढत होता. या सोहळ्यात दीपिकाने जांभळ्या रंगाची साडी परिधान करून चाहत्यांची मने जिंकली. त्यानंतर दीपिकाने लग्नाला घातलेल्या ड्रेसवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
संबंधित बातम्या