Viral Video : या सासू-सुनेचं पटत नाही वाटतं! नीतू कपूरने भर कार्यक्रमात केलं आलियाकडे दुर्लक्ष
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video : या सासू-सुनेचं पटत नाही वाटतं! नीतू कपूरने भर कार्यक्रमात केलं आलियाकडे दुर्लक्ष

Viral Video : या सासू-सुनेचं पटत नाही वाटतं! नीतू कपूरने भर कार्यक्रमात केलं आलियाकडे दुर्लक्ष

Dec 17, 2024 12:49 PM IST

Alia-Neetu Viral Video : आलिया भट्टचे सासू नीतू कपूर यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण, यादरम्यान दोघींचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

आलिया भट्ट आणि नीतू कपूर
आलिया भट्ट आणि नीतू कपूर

Alia Bhatt And Neetu Kapoor Video : गेल्या आठवड्यात कपूर कुटुंबाने मुंबईत राज कपूर फिल्म फेस्टिव्हलचा कार्यक्रम आयोजित केला होता. राज कपूर यांच्या १००व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, आता समोर येत असलेल्या एका व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सासू सुनेत बिनसलेलं दिसलं आहे. आता हा व्हिडिओ शेअर करून लोक म्हणत आहेत की, ही गोष्ट घरोघरची आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रणबीर कपूर आलियाला सांगतो की, मागून मम्मी येत आहे. त्यानंतर आलिया मागे जाऊन आई-आई असा आवाज देते. नीतू पुढे गेल्यावर आलिया त्यांच्याजवळ पोहोचणारच होती. मात्र, नीतू कपूर यांनी सुनेकडे सरळ कानाडोळा केला. यावेळी आलियाही थोडी गोंधळलेली दिसत होती.

नेटकरी काय म्हणाले?

या व्हिडिओवर आता लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली की, ‘ही तर प्रत्येक घरची गोष्ट आहे.’ आणखी एकाने लिहिले की, ‘कौटुंबिक समारंभात सुनेला कमीपणा दाखवणे हे सासूचे कामच असते.’ तर, काही जण यावर विनोद करतानाही दिसत आहेत.

बरं, हे असं काही गांभीर्यानं घडलं नसावं. घाईगडबडीत या गोष्टी अनेकदा नकळत घडून जातात. हे सर्व केवळ एका क्षणासाठी असेल, कारण या कार्यक्रमादरम्यान दोघींचे अनेक गोंडस क्षणही पाहायला मिळाले आहेत. दोघीही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसल्या.

Tejashri Pradhan : हो मला आता लग्न करायचं आहे! तेजश्री प्रधानला थाटायचाय पुन्हा संसार; मग अडतंय कुठं?

दिग्गजांनी लावली हजेरी!

नुकताच राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्ताने चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात राज कपूर यांचे १० चित्रपट दाखवण्यात आले. 'आग', 'बरसात', 'आवारा', 'श्री ४२०', 'जागते रहो', 'जिस देश में गंगा बहती है', 'संगम', 'मेरा नाम जोकर', 'बॉबी', 'राम तेरी गंगा मैली' हे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या चित्रपट महोत्सवात कपूर कुटुंबासोबतच महेश भट्ट, रेखा, कार्तिक आर्यन, शर्वरी, संजय लीला भन्साळी, पद्मिनी कोल्हापुरे, विकी कौशल, बोनी कपूर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध स्टार्स सहभागी झाले होते.

आलियाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेर ‘जिगरा’मध्ये दिसली होती. आता तिच्याकडे दोन मोठे सिनेमे आहेत, एक ‘अल्फा’ आणि दुसरा ‘लव्ह अँड वॉर’ रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ‘अल्फा’मध्ये आलिया आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशल देखील आहेत.

Whats_app_banner