मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आलियाच नाही 'या' अभिनेत्रींच्या प्रेग्नेंसीबद्दल ऐकून चाहत्यांना बसला होता धक्का
alia bhatt to dia mirza
alia bhatt to dia mirza
27 June 2022, 19:48 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 19:48 IST
  • आलिया भट्ट हिने १४ एप्रिल रोजी रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या २ महिन्यातच आलिया आणि रणबीरने आनंदाची बातमी देत चाहत्यांना धक्का दिला.

लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने १४ एप्रिल रोजी रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या २ महिन्यातच आलिया आणि रणबीरने आनंदाची बातमी देत चाहत्यांना धक्का दिला. त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये आलिया लग्नापूर्वीच गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र या चर्चा खोट्या असल्याचंदेखील समोर आलं. फक्त आलियाच नाही तर यापूर्वीही बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी अचानक आपण गरोदर असल्याचं सांगत चाहत्यांना धक्का दिला होता. यातील काही अभिनेत्री लग्नापूर्वीच गरोदर होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

१. नीना गुप्ता-

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता लग्नाआधीच गरोदर होत्या. त्यांनी विवियन रिचर्ड्स सोबत विवाहगाठ बांधली होती. मात्र तो आधीपासूनच विवाहित असल्याने नीना यांनी त्यांच्या मुलीचा एकटीने सांभाळ केला.

 

२. कोंकणा सेन शर्मा -

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने काही महिने डेट केल्यानंतर २०१० साली रणवीर शौरी सोबत विवाह केला होता. लग्नाच्या सहा महिन्यातच कोंकणाने एका मुलाला जन्म दिला.

३. श्रीदेवी-

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी १९९६ मध्ये बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या एका वर्षातच त्यांनी जान्हवी कपूरला जन्म दिला होता.

 

४. महिमा चौधरी-

'परदेस' स्टार महिमा चौधरी हिने २००६ साली बॉबी मुखर्जी सोबत लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यातच तिने एका मुलीला जन्म दिला होता.

 

५. नेहा धुपिया

अभिनेत्री नेहा धुपिया हिने जेव्हा २०१८ मध्ये अचानक अंगद बेदी सोबत लग्न केलं तेव्हा प्रत्येकजण चकित झाला होता. त्यानंतर एका कार्यक्रमात अंगदने नेहा लग्नापूर्वीच गरोदर असल्याचा खुलासा केला होता.

६. दिया मिर्झा-

अभिनेत्री दिया मिर्झा हिने फेब्रुवारी २०२१ साली वैभव रेखी सोबत विवाह केला होता. मात्र लग्नाच्या २ महिन्यातच तिने आपण गरोदर असल्याचं म्हटलं होतं.

 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग