धूमधडाका चित्रपट म्हणजे मराठी इंडस्ट्रीमधील एक माईलस्टोन सिनेमा समजला जातो. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवलकर अशी एकापेक्षा धम्माल आणि दिग्गज कलाकारांची जमलेली भट्टी प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीत. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांनी केले आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे काही मजेदार किस्से सांगितले आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान महेश कोठारे आणि धनाजीराव वाकडे ही अजरामर भूमिका साकारणारे शरद तळवलकर यांच्यात काही वाद झाले होते. हे वाद इतके टोकाला गेले की महेश यांनी थेट शरद यांना सिनेमातून काढून टाकण्याची धमकी दिली होती.
'धूमधडाका' हा सिनेमा गाजलेला हिंदी चित्रपट 'प्यार किये जा'चा रिमेक होता. महेश यांना या चित्रपटाची स्क्रिप्ट लोकप्रिय पटकथालेखक अण्णासाहेब देऊळकर यांच्याकडून लहून घ्यायची होती. अण्णासाहेब देऊळकर म्हणजे लेक चालली सासरला, माहेरची साडी, कुंकू, खट्याळ बायको नाठाळ सून नशीबवान या सारख्या सुपरहिट चित्रपटांचे पटकथाकार. मात्र अण्णांनी महेश यांचे सहाय्यक असलेल्या नाना करमरकरांचे नाव पठकथालेखनासाठी सुचवले. त्यांचा सल्ल्यानुसार नानांना ही जबाबदारी मिळाली. मात्र स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर महेश यांच्या लक्षात आलं कि नानांनी प्यार किये जा चे डायलोग तसेच्या तसे मराठी उतरवले आहेत. याची तक्रार त्यांनी अण्णासाहेब देऊळकरांकडे केली. त्यानंतर अण्णांनी महेश आणि त्यांनी दोघांनी बसून पुन्हा स्क्रिप्ट लिहायचं असं ठरवलं.
स्क्रिप्ट मनासारखी लिहून झाली आणि चित्रपटाच्या मुहूर्ताचा दिवस जवळ आला. सर्व कलाकारांच्या राहण्याची सोय पन्हाळ्यावरील एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती. महेश यांनी धुमधडाकाच संपूर्ण 'स्क्रिप्ट' सर्व कलाकारांना आधीच वाचायला दिलं होतं. मात्र मुहूर्ताचा सिन शूट करणार त्याच्या आदल्या दिवशी तळवलकर पहिल्या स्क्रिप्टचे लेखक नाना करमरकर याना घेऊन सेटवर आले. नाना या चित्रपट एक छोटासा रोल देखील करणार होते. शरदरावांच्या हालचालींवरून त्यांना काहीतरी बोलायचं आहे असे महेश यांना वाटले. मग त्यांनी स्वतःच विषयाला हात घालत म्हणाले, "काय शरदराव, काही सांगायचं होतं का तुम्हाला?"
"महेश, आपल्या नानानं आधी जे 'स्क्रिप्ट' लिहिलं होतं तेच खूप छान होतं रे. अण्णांनी स्क्रिप्ट मध्ये सगळ्यांना बांधून ठेवलंय!" असे शरद म्हणाला. ते ऐकून महेश दोन मिनिटं हादरलेच. द्या सकाळी शूट सुरु होणार आणि आदल्या रात्री चित्रपटाचं 'स्क्रिप्ट' चांगलं नाही, असं एक ज्येष्ठ आणि तरबेज अभिनेते महेश याना सांगत होता. महेश विचारात पडले असता.. सोबत आलेले नाना करमरकर म्हणाले, 'शरदरावांचे म्हणणं मला बरोबर वाटतंय. माझंच 'स्क्रिप्ट' तुम्ही घेतली असती तर बरं झालं असत.'
तरुण वय आणि दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असल्याने महेश त्यावेळी खूप तडकाफडकी निर्णय घ्यायचे. कोणी आपल्याला 'डॉमिनेट' करू नये, असं त्यांना वाटायचं. मोठमोठे कलाकार नवख्या दिग्दर्शकांना तसं करतात, असा त्यांचा समाज होता मात्र. आपल्याबाबत तसं अजिबात होऊ द्यायचं नाही असा विचार करत महेश शरदरावांना म्हणाले, "शरदराव, अण्णासाहेबांचं हेच 'स्क्रिप्ट' आपण फॉलो करणार आहोत. कारण ते खूप विचार केल्यानंतरच आम्ही 'ओके' केलंय! तुम्हाला जर का ते आवडलं नसेल तर तुम्ही हा चित्रपट सोडू शकता आज रात्रभर तुम्ही विचार करा आणि उद्या सकाळपर्यंत मला तुमचा निर्णय सांगा. म्हणजे मला दुसरा रिप्लेसमेन्ट' शोधता येईल!" महेश यांचं हे रोखठोक बोलणं शरदरावांना जराही अपेक्षित नव्हत हे सर्व ऐकून ते थोडे ते गांगरले. नाना करमरकरांच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले.
वाचा: अभिनेत्री नग्न अवस्थेत व्ही. शांताराम यांच्यासमोर उभी राहिली आणि मग...
दुसऱ्या दिवशी सकाळी. महेश सेटवर आले मात्र त्यांच्या आधीच शरदराव तिथे उपस्थित होते. शरद तळवलकरांनी अनेक वर्ष मराठी चित्रपट आणि रंगभूमी आपल्या अदाकारीनं गाजवली होती, परंतु त्यांनी 'स्क्रीप्ट'चा मुद्दा काढून आपल्याला अडचणीत आणायला नको होते असे महेश यांचं मत. त्यामुळे महेश यांचा त्यांच्यावरचा राग अजूनही कायमच होता. महेश यांनी कामाला सुरुवात केली. त्यांना पाहून शरदराव महेश यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, ''महेश, करूया आपण हा चित्रपट एकत्र." ते ऐकताच महेश म्हणाले, ''करूया म्हणजे काय शरदराव... करायलाच पाहिजे! मला तुमचं संपूर्ण सहकार्य हवंय आणि मुख्य म्हणजे आपण अण्णासाहेबांचं 'स्क्रिप्ट' फॉलो करणार आहोत!"
संबंधित बातम्या