मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मध्यरात्री अभिनेते धर्मेंद्र यांनी शेअर केला खास फोटो, पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

मध्यरात्री अभिनेते धर्मेंद्र यांनी शेअर केला खास फोटो, पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
May 01, 2024 09:41 AM IST

मध्यरात्री धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोवरुन त्यांना नेमकं काय म्हणायचं असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मध्यरात्री अभिनेते धर्मेंद्र यांनी शेअर केला खास फोटो, पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष
मध्यरात्री अभिनेते धर्मेंद्र यांनी शेअर केला खास फोटो, पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाची ८० वर्षे ओलांडल्यानंतरही त्यांचा चित्रपटांमध्ये काम करण्याचा उत्साह तुसभरही कमी झालेला दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. काय आहे ही पोस्ट चला पाहूया…

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे धर्मेंद्र यांची पोस्ट?

धर्मेंद्र यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते फार्महाऊसवर असल्याचे दिसत आहे. तसेच ते ट्रॅक्टर चालवताना दिसत आहेत. ‘मित्रांनो तुमच्या आशिर्वादाने आणि देवाच्या कृपेने मी माझ्या शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहे. तुम्हाला सर्वांना खूप प्रेम… हा ट्रॅक्टर राजकोटच्या एका चाहत्याने मला भेट म्हणून दिला आहे’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिला आहे. फोटोमध्ये धर्मेंद्र निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरवर बसले आहेत. तसेच त्यांनी डोक्यावर टोपी, चॉकलेटी रंगाचा शर्ट आणि पँट घातली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
वाचा: घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

धर्मेंद्र हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते अनेकदा मध्यरात्री पोस्ट शेअर करताना दिसतात. यापूर्वी त्यांनी त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंत्तेचे वातावरण पाहायला मिळाले. आता त्यांनी एक वेगळा फोटो शेअर केला आहे. या फोटोने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: 'लोकांना लाज का वाटत नाही', इंटीमेट सीनवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीने सुनावले

धर्मेंद्र यांच्या कामाविषयी

धर्मेंद्र हे लवकरच श्रीराम राघवन याच्या ‘इक्कीस’ या चित्रपटात दिसणार आहेत. धर्मेंद्र यांच्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असल्याचे दिसत आहे. नुकताच त्यांचा अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ चित्रपट आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. गेल्या वर्षी धर्मेंद्र ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ चित्रपटात दिसले होते. त्यांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. या चित्रपटामध्ये त्यांनी शबाना आझमी यांच्यासोबत किसिंग सीन दिला होता.
वाचा: “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ‘ही’ अभिमान गीते

IPL_Entry_Point

विभाग