देशाचे 'रत्न' रतन टाटा यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. त्यांच्या जाण्याने सर्वांचे डोळे पाणावले आहेत. रतन टाटा हे सर्वांसाठी प्रेरणास्थान होते. बॉलिवूडमधील सर्व स्टार्सनी रतन टाटा यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनाही त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. धर्मेंद्र यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटले की, त्यांच्या निधनाने एका अभिनेत्याची इच्छा कायमची अपूर्ण राहिली आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रतन टाटा यांचा एक फोटो शेअर करत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. धर्मेंद्र यांनी, 'रतन टाटा साहेब, तुम्हाला भेटायचे राहून गेले. स्वत:च्या मुलांप्रमाणे आपल्या सेवकांची काळजी घेणारा नम्र राजा. सर, तुम्ही कायम अपार प्रेमाने आणि आदराने स्मरणात राहाल' या आशयाची पोस्ट केली आहे. धर्मेंद्र यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यावर कमेंट करत युजर्स रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
धर्मेंद्र यांच्याव्यतिरिक्त अनुपम खेर, अमिताभ बच्चन, रितेश देशमुख यांच्यासह अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत. बिग बींनी एक्स ट्विटर आणि इन्स्टाग्राम या दोन्ही अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. अमिताभ यांनी लिहिले की, 'रतन टाटा यांच्या निधनाची बातमी मला नुकतीच समजली. मी बराच काळ त्यांच्यासोबत काम केले आहे. अत्यंत आदरणीय, नम्र पण पुढारलेले नेते, ज्यांची दूरदृष्टी आणि संकल्प अतुलनीय होते. त्यांच्यासोबत आम्ही अनेक छान क्षण घालवले, अनेक मोहिमांमध्ये आम्हाला एकत्र राहण्याची संधी मिळाली.'
Manvat Murders Review: परभणीतील सत्य घटनेवरील थरारक कथा, वाचा 'मानवत मर्डर'चा रिव्ह्यू
रितेशने रतन टाटायांच्याशी संबंधित एक मार्मिक किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा रितेश आणि जेनेलियाच्या हनीमूनदरम्यानचा आहे. ते दोघे हनीमूनला गेले असताना अचानक रतन टाटा यांची भेट झाली होती. या भेटीचा किस्सा रितेशने सांगितला आहे.
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता. त्यांच्या आईचे नाव सुनू टाटा होते आणि ते नौशेरवानजींचे पुत्र होते. रतन टाटा १० वर्षांचे असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. रतन टाटा हे असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्यावर सगळ्यांनीच भरभरून प्रेम केले.