मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  धर्मेंद्र यांनी पहाटे शिळी पोळी खाल्ली! पोस्ट झाली व्हायरल, चाहते पडले काळजीत

धर्मेंद्र यांनी पहाटे शिळी पोळी खाल्ली! पोस्ट झाली व्हायरल, चाहते पडले काळजीत

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 01, 2024 12:05 PM IST

Dharmedra Deol : धर्मेंद्र यांनी शुक्रवारी पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांनी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो पोस्ट केला. फोटो पाहून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

Dharmedra Deol
Dharmedra Deol

हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र नेहमी चर्चेत असतात. आज शुक्रवारी पहाटेच ३ वाजून ५२ मिनिटांनी त्यांनी आपला एक फोटो पोस्ट केला. सोशल मीडियावर हा फोटो लगेच व्हायरलही झाला असून, हा फोटो पाहून त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत आहे.

अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज वयाच्या ८८ व्या वर्षी देखील धर्मेंद्र मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. एवढंच नाही तर, त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

चित्रपटांसोबतच धर्मेंद्र सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. ते स्वत:शी संबंधित काही पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान, आता त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ते शिळी भाकरी खाताना दिसत आहे. याशिवाय त्यांची प्रकृतीही चांगली दिसत नाही आहे.

सोशल मीडियावर आलेल्या या फोटोत धर्मेंद्र अर्ध्यारात्री पलंगावर बसलेले आहे. त्यांचे केसंही विस्कटलेले आहे आणि त्यांच्या हातात एक ताट असून, त्यात अर्धी पोळी लोणीसोबत ठेवलेली आहे. सोबतच त्यांच्या पायाला प्लास्टरही आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहीलंय की, "अर्धी रात्र झाली...झोप येत नाही..भूकही लागून जाते. मित्रांनो शिळ्या पोळीसोबत लोणी खूपच स्वादीष्ट लागते, हा हा."

त्यांची ही पोस्ट समोर आल्यावर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका चाहत्याने काळजीपोटी तुमच्या पायाला काय झाले? विचारले असता , धर्मेंद्र यांनी उत्तर देत म्हटले आहे की, माझा पाय फॅक्चर झाला आहे. पण तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेनं लवकरच तंदरुस्त होऊन जाईल. या पोस्ट वर खूप कमेंटस् येत आहे आणि काही कमेंट्सवर अभिनेते धर्मेंद्र यांनी चाहत्यांना उत्तरही दिले आहे.

या चित्रपटांमध्ये दिसतील धर्मेंद्र

त्यांच्या कामासंबंधी बोलायचे झाले तर, अभिनेते 'अपने2' चित्रपटात दिसतील. याआधी त्यांनी 'तेरी बातो में उलझा जिया' या चित्रपटात त्यांनी काम केलं. या चित्रपटात त्यांचा अभिनयाचे फार कौतूक झाले.

IPL_Entry_Point

विभाग