मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'धर्मवीर'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना!! पहिल्या आठवड्यात 'इतक्या' कोटींची कमाई
धर्मवीर
धर्मवीर (HT)
21 May 2022, 3:10 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
21 May 2022, 3:10 AM IST
  • १३ मे रोजी हा चित्रपट तब्बल चारशेहुन अधिक चित्रपटगृहे आणि १० हजारांहून अधिक शोज् सह प्रेक्षकांच्या भेटीस आला

महाराष्ट्रात सध्या धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे चित्रपटाचाच बोलबाला आहे. १३ मे रोजी हा चित्रपट तब्बल चारशेहुन अधिक चित्रपटगृहे आणि १० हजारांहून अधिक शोज् सह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले. याच दिवशी हिंदीतील मोठ्या निर्मितीसंस्थेचे आणि तगडी स्टारकास्ट असलेले चित्रपट प्रदर्शित झाले होते. परंतु धर्मवीर पुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अगदी पहिल्याच दिवसापासून धर्मवीरची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. 'धर्मवीर'ने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींचं बॉक्सऑफिस कॅलेक्शन गाठलंय. केवळ ठाण्यानेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राने 'धर्मवीरांचा जय महाराष्ट्र' प्रेमानं स्वीकारलाय.

ट्रेंडिंग न्यूज

हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं पण 'धर्मवीर' ने बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहेच.

याप्रसंगी झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख म्हणाले, "मराठी चित्रपटासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. 'धर्मवीर' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींची कमाई केली आहे. आपण नेहमी ऐकतो, मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत पण सिनेमा दर्जेदार असेल तर सिनेमागृहांकडून समोरून विचारणा होते. आम्ही ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त शोज् सध्या सुरु आहेत. सिनेमा चांगला असेल तर प्रेक्षकसुद्धा तो सिनेमा डोक्यावर घेतात आणि याचं उत्तम उदाहरण 'धर्मवीर' आहे."

मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या काही दिवसांत लोकप्रियतेचे आणि कमाईचे नवे शिखर गाठेल असा अंदाज सिनेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook