Dharmaveer 2: सुप्रसिद्ध गायकांचा स्वरसाज; ‘धर्मवीर २’ चित्रपटाचं पहिलंवहिलं गाणं ‘चला करू तयारी’ प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dharmaveer 2: सुप्रसिद्ध गायकांचा स्वरसाज; ‘धर्मवीर २’ चित्रपटाचं पहिलंवहिलं गाणं ‘चला करू तयारी’ प्रेक्षकांच्या भेटीला

Dharmaveer 2: सुप्रसिद्ध गायकांचा स्वरसाज; ‘धर्मवीर २’ चित्रपटाचं पहिलंवहिलं गाणं ‘चला करू तयारी’ प्रेक्षकांच्या भेटीला

Jul 15, 2024 09:36 PM IST

Dharmaveer 2 Music Launch: ‘धर्मवीर २’च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच म्युझिक लाँच सोहळा शालेय मुलाच्या उपस्थित पार पाडला.

Dharmaveer 2 Music Launch
Dharmaveer 2 Music Launch

Dharmaveer 2 Music Launch: ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ उलगडण्यासाठी सज्ज असलेल्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटाविषयी सध्या सगळ्यांमध्येच प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लाँच सुप्रसिध्द ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन, ठाणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. या म्युझिक लाँच कार्यक्रमासोबतच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना 'आनंद माझा' या पुरस्काराने गौरवण्यात आले.

धर्मवीर २’ या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून कॅमेरा मन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता ‘धर्मवीर २’ चित्रपटातील गाणी पाहिल्यावर चित्रपटाचं कथानक, कलाकार यविषयाची लोकांना असलेली उत्सुकता खूपच वाढली आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

मराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच म्युझिक लाँच सोहळा शालेय मुलाच्या उपस्थित पार पाडला. यावेळी गुरु पोर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने तब्बल ४५ बालकलाकारांनी पहिल्यांदाच ‘धर्मवीर’ चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. स्वर्गीय आनंद दिघे यांनी राजकारण आणि समाजकारणाचा सुंदर मेळ घातला होता. त्यामुळेच त्यांची प्रचंड लोकप्रियता निर्माण झाली होती. शालेय विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू करण्याचा पहिला प्रयत्न दिघे साहेबांनीच सुरू केला होता. त्यामुळे चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात गुरू पौर्णिमा गाण्याच्या सादरीकरणासह "चला करू तयारी..." हे गाणं उपस्थितांना दाखवण्यात आले. त्याशिवाय दहावितील परीक्षेतील उत्तम गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं ‘आनंद माझा’ पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आलं.

चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना भावणार!

‘धर्मवीर २’ या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे, डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश-विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. तर, ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग,विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. आजपासून या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना बघता येणार आहेत. तर, ‘धर्मवीर २’ हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी जगभरात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Whats_app_banner