Dharmaraobaba Atram Movie: नक्षलवादीयांपासून स्वतःची सुटका करत आदिवासी जमातीला आशेचा किरण दाखवणारा एक केंद्रबिंदू म्हणजे श्री.धर्मरावबाबा आत्राम. लवकरच या महान व्यक्तिमत्त्वाची झलक मोठ्या पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. धर्मरावबाबा आत्राम यांची जीवन गाथा लवकरच 'धर्मरावबाबा आत्राम - दिलों का राजा' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहेय
'धर्मरावबाबा आत्राम - दिलों का राजा' या चित्रपटाच्या ११ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये 'जल,जंगल,जमीन हमारा है और ये जमीन मालीकाना हक़ हमारा अधिकार है", असं ब्रीदवाक्य ऐकायला येत आहे. नक्षलवाद, तेथील थरार, आदिवासी पाड्यांचा विकास आणि धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनप्रवास या ट्रेलरमध्ये हुबेहूब मांडण्यात आला आहे. या ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आता सर्वजण चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत.
वाचा: चला हवा येऊ द्यामधून कुशल बद्रिकेची एग्झिट? अभिनेत्याने सांगितले सत्य
'धर्मरावबाबा आत्राम - दिलों का राजा' या भव्य चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माती नीतू जोशी यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. तर दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू उत्तमरित्या पेलवली आहे. तर धर्मरावबाबा आत्राम यांची तरुणपणीची भुमिका अभिनेता जितेश मोरे याने साकारली आहे.
वाचा: कुठला चित्रपट जिंकणार ऑस्कर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार पुरस्कार सोहळा
या चित्रपटाबाबत बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, "मला नवीन जीवन मिळाले. नक्षलवादींपासून सुटका करत मी बाहेर आलो. नदी नाल्याच पाणी प्यायचो. जंगलाबाहेर पडेन की नाही याची शाश्वतीही नव्हती. या सर्व प्रवासाची व संघर्षाची बाजू या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे."
वाचा: सनी लिओनीला मराठी गाण्याची भूरळ, 'नवरोबा'वर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल
यापूर्वी घर बंदूक बिरयाणी या चित्रपटात नक्षलवाद दाखवण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. तसेच चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. 'धर्मरावबाबा आत्राम - दिलों का राजा' हा चित्रपट किती कमाई करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या