Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?

Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?

Jan 29, 2025 12:06 PM IST

Nayanthara Dhanush Clash : मद्रास हायकोर्टाने धनुष आणि नयनतारा यांच्या वादात नेटफ्लिक्सची याचिका फेटाळली आहे. नयनताराच्या माहितीपटात धनुषच्या एका चित्रपटाशी संबंधित काही फुटेज वापरले गेले होते. यासंदर्भात त्याने नयनताराविरुद्ध केस दाखल केली होती.

नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?
नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?

Nayanthara Dhanush Documentary Clash : अभिनेता धनुष आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यातील एक वाद मद्रास उच्च न्यायालयात पोहोचला होता. यात आता धनुषने विजय मिळवला आहे. धनुषने दाखल केलेल्या कॉपीराईट प्रकरणी नेटफ्लिक्स इंडियाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. धनुषने दावा केला होता की त्याच्या चित्रपटातील ३ सेकंदाची क्लिप नयनताराच्या माहितीपटात परवानगीशिवाय वापरली गेली होती.

धनुषने नयनताराविरोधात दाखल केला होता गुन्हा!

धनुषने नोव्हेंबर २०२४मध्ये नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन आणि त्यांचे प्रोडक्शन हाऊस राउडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. धनुषने नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल'मध्ये नयनतारा आणि इतरांनी आपली परवानगी न घेता 'नानुम राउडी धान' चित्रपटातील फुटेज वापरल्याचे म्हटले होते.

Dhanush Vs Nayanthara: धनुषने ठोठवले उच्च न्यायालयाचे दार! नयनताराला आता अडचणीत आणणार?

धनुषने आधीच दिली होती नोटिस!

या क्लिपचा वापर झाल्याचे कळताच धनुषने त्यावेळी नेटफ्लिक्सला इशारा दिला होता की, नयनताराच्या डॉक्युमेंटरीमधून 'नानुम राउडी धान'ची ३ सेकंदाची क्लिप २४ तासांच्या आत हटवली नाही तर कायदेशीर लढाई लढू. तर, न्यायमूर्तींनी गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सने दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय कोणतीही तारीख न सांगता पुढे ढकलला होता. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायाधीश अब्दुल कुद्दूस यांनी निर्णय दिला की, डॉक्युमेंटरी रिलीज करण्याचा करार करणाऱ्या नेटफ्लिक्सला कॉपीराइटवर दावा ठोकण्याचा कोणताही अधिकार नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अभिनेत्री नयनताराची डॉक्युमेंट्री 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल' रिलीज झाल्यानंतर धनुष आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसने नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने नयनताराकडून उत्तर मागितले होते. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीने सांगितले होते की, तिने धनुषकडे चित्रपटाची क्लिप वापरण्याची परवानगी मागितली होती, जी तिला मिळाली होती. त्यानंतरच तिने बीटीएस फुटेजचा वापर केला होता. तर ही क्लिप चित्रपटातील नसल्याचा युक्तिवाद तिने केला होता. यानंतर धनुषने नयनताराला कायदेशीर नोटीस पाठवून भरपाई म्हणून १० कोटी रुपयांची मागणी केली होती. हा संपूर्ण वाद गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाला होता, ज्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. याचा निकाल आता अभिनेता धनुषच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे आता नयनताराला मोठा धक्का बसला आहे.

Whats_app_banner