मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dhanashri Kadgaonkar: नेटकऱ्याची अभिनेत्री धनश्री काडगावकरकडे विकृत मागणी! म्हणाला ‘ब्रा घातलेला फोटो...’

Dhanashri Kadgaonkar: नेटकऱ्याची अभिनेत्री धनश्री काडगावकरकडे विकृत मागणी! म्हणाला ‘ब्रा घातलेला फोटो...’

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 17, 2024 09:54 AM IST

Dhanashri Kadgaonkar Instagram Post: ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ‘शिल्पी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Dhanashri Kadgaonkar Instagram Post
Dhanashri Kadgaonkar Instagram Post

Dhanashri Kadgaonkar Instagram Post: सोशल मीडिया हा जितका लोकांशी कनेक्ट होण्यासाठी महत्त्वाचा आहे, तितकाच तो काही लोकांमुळे नकोसा देखील वाटू लागणारा आहे. सोशल मीडिया म्हणजे कुणाला काहीही बोलण्याची मुभा असणारी जागा, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, काही कलाकारांना सोशल मीडियामुळे मनःस्ताप देखील सहन करावा लागतो. असाच काहीसा अनुभव आता मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिला आला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीकडे एका नेटकऱ्याने अतिशय विचित्र मागणी केली आहे.

‘तू चाल पुढं’ या मालिकेत ‘शिल्पी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून धनश्री नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतंच तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यात तिने चाहत्यांशी खूप गप्पा मारल्या. यावेळी तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. मात्र, यावेळी धनश्रीला एका विचित्र अनुभवला समोरं जावं लागलं आहे. या गप्पाटप्पांच्या सेशनमध्ये एका विकृत व्यक्तीने अभिनेत्रीकडे अतिशय विचित्र मागणी केली आहे. याचा स्क्रीन शॉट तिने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे.

Merry Christmas Day 5: कतरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’ बजेटही वसूल करेना! पाचव्या दिवशीही अवघी ‘इतकी’ कमाई

अभिनेत्री धनश्री काडगावर हिने घेतलेल्या या ‘आस्क मी सेशन’मध्ये एका व्यक्तीने तिच्याकडे ‘ब्रा घातलेला फोटो द्या’ अशी मागणी केली आहे. धनश्री काडगावकर हिने नुकताच चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिने चाहत्यांना ‘मला पुण्यातील काही प्रसिद्ध फिरण्याची ठिकाणं सांगा’ असं विचारलं होतं. यावेळी अनेकांनी तिला पुण्यातील सुंदर ठिकाणांची नावं सांगितली. याच सेशनमध्ये एक व्यक्तीने धनश्रीला भलताच प्रश्न केला आहे. या अज्ञात व्यक्तीने धनश्रीकडे ब्रा घातलेल्या फोटोची मागणी केली. तर, या व्यक्तीला चोख उत्तर देताना धनश्रीने देखील या प्रश्नाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.

या प्रश्नाचा स्क्रिनशॉट शेअर करताना धनश्रीने म्हटले की, ‘काय कारायचं अशा लोकांचं?’ असं म्हटलं आहे. धनश्री काडगावकर ही मुळची पुण्याची असली, तरी कामाच्या निमित्ताने ती मुंबईत स्थायिक झाली आहे. मात्र, आजही तिला पुण्याची भरपूर ओढ आहे. नुकतीच तिची ‘तू चाल पुढं’ ही मालिका ऑफ एअर गेली आहे. आता सध्या ती ब्रेकवर असून पुण्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहे.

WhatsApp channel

विभाग