दिल्लीत तरुणीच्या हत्येची एक हृदयद्रावक घटना समोर आल्याने लोकांच्या अंगावर शहारे आले आहेत. २६ वर्षीय तरुणाने आपल्या मैत्रिणीचे ३५ तुकडे केले. यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले. आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धाची प्रेमकहाणी अचानक क्राइम स्टोरीमध्ये बदलली. पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा आफताबने एक सीरिजपाहून मैत्रिणीला संपवल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला अटक केली. २८ वर्षीय आफताबने दिल्लीमध्ये राहात असलेल्या लिव्ह पार्टन श्रद्धाची हत्या करुन तिचे ३५ तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे ठेवण्यासाठी एक फ्रिज खरेदी केला. त्यानंतर तो दररोज रात्री दोन वाजता दिल्लीमधील जंगलात ते तुकडे फेकण्यासाठी जात होता. जेव्हा पोलिसांनी श्रद्धाची अशा प्रकारे हत्या करण्याची आयड्या कुठून सुचली असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने 'डेक्सटर' या सीरिजचा उल्लेख केला. त्यामुळे डेक्सटर ही सीरिज नेमकी काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: या राक्षसाला...; स्वरा भास्करची श्रद्धा वालकर प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
डेक्सटर ही एक क्राइम- ड्रामा आहे. या सीरिजमध्ये डेक्सटर ही भूमिका मायकल सीने साकारली आहे. या सीरिजची कथा डेक्सटर या मुलाच्या आयुष्याभोवती फिरते. या तीन वर्षांच्या मुलाला मियानी पोलीस अधिकारी गॅरी मॉर्गन दत्तक घेतो. लहानपणीच तो त्याची आईची क्रूरपणे हत्या केल्याचे पाहातो. या घटनेमुळे त्याच्या मनावर आणि मेंदूवर परिणाम होतो. हॅरीला डेक्सरच्या मेंदूवर परिणाम झाला असल्याचे कळते. ते दोघीही क्रिमिनल्सची हत्या करण्यास मदत करतो. स्वत:ला वाचवण्यासाठी डेक्सटर मियामी पोलीस ठाण्यातील फॉरेंसिक स्पेशलिस्ट म्हणून नोकरु करु लागतो.
क्रिमिनल्सची हत्या करण्यापूर्वी डेक्सटर पूर्ण तयारी करतो. तो हातात ग्लव्स घालून हत्या करतो. तसेच ज्या खोलीमध्ये तो हत्या करतो ती खोली पूर्ण प्लास्टिकने कव्हर करतो. हत्या करुन त्या व्यक्तींचे तुकडे तो अटलांटिक महासागरात फेकतो. डेक्सटर या सीरिजचे ८ सिझन प्रदर्शित झाले आहेत. २००६ साली या सीरिजचा पहिला सिझन आला होता. त्यानंतर २०१३ साली शेवटचा सिझन प्रदर्शित झाला. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
संबंधित बातम्या