Kissing scene: चित्रपटात किसिंग सिन देणारी'ही' होती पहिली अभिनेत्री, एक-दोन नव्हे तब्बल ४ मिनिटांचा होता सिन
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kissing scene: चित्रपटात किसिंग सिन देणारी'ही' होती पहिली अभिनेत्री, एक-दोन नव्हे तब्बल ४ मिनिटांचा होता सिन

Kissing scene: चित्रपटात किसिंग सिन देणारी'ही' होती पहिली अभिनेत्री, एक-दोन नव्हे तब्बल ४ मिनिटांचा होता सिन

Dec 29, 2024 01:35 PM IST

Bollywood kissing scene: आजच्या लेखात आपण 50-60 च्या दशकाबद्दल बोलत आहोत. यादरम्यान एका चित्रपटात नायक आणि नायिका एकमेकांच्या खूप जवळ दाखवण्यात आले होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल त्याकाळात एका प्रसिद्ध अभिनेत्रीने ऑनस्क्रीन किसिंग सीन देऊन खळबळ माजवली होती.

What was the first kissing scene in Bollywood
What was the first kissing scene in Bollywood

Who was the first actress to give a kissing scene in Bollywood:  बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेकदा रोमँटिक सीन केले जातात. पण एक वेळ अशी होती की असा कोणताही सीन करण्यापूर्वी १०० वेळा विचार करावा लागायचा. आजच्या लेखात आपण 50-60 च्या दशकाबद्दल बोलत आहोत. यादरम्यान एका चित्रपटात नायक आणि नायिका एकमेकांच्या खूप जवळ दाखवण्यात आले होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल त्याकाळात एका प्रसिद्ध अभिनेत्रीने ऑनस्क्रीन किसिंग सीन देऊन खळबळ माजवली होती.

या चित्रपटात पहिला किसिंग सीन शूट करण्यात आला होता-

1933 मध्ये रिलीज झालेल्या 'कर्मा' चित्रपटात पहिला किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता. त्यावेळी या चित्रपटापूर्वी कोणीही किसिंग सीन करण्यात आला नव्हता. या सीनमुळे सर्वत्रच खळबळ माजली होती. यावेळी अनेकांनी सीनवर आक्षेप घेत टीका केली होती तर काहींनी अभिनेत्रीच्या धाडसाचं कौतुक केलं होतं.

बॉलिवूडचा पहिला किसिंग सीन तब्बल 4 मिनिटांचा होता-

बॉलिवूडचा पहिला किसिंग सीन हा हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात दीर्घ किसिंग सीन होता. यामध्ये अभिनेत्री देविकाने अभिनेता हिमांशूला कमी कालावधीसाठी अनेक वेळा किस केले होते. हे दृश्य सुमारे 4 मिनिटे चालले होते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या चित्रपटात अभिनेता बेशुद्ध होतो आणि त्याला शुद्धीवर आणण्यासाठी अभिनेत्री त्याला किस करते तेव्हा हा सीन करण्यात आला होता. हा सीन बॉलिवूडच्या इतिहासातील पहिला किसिंग सीन म्हणून नोंदवला गेला आहे.

त्याकाळात फुले आणि पक्ष्यांचा आश्रय घेतला जात असे-

एक काळ असा होता की, अशी दृश्ये चित्रित करण्यासाठी फुले आणि पक्ष्यांचा वापर केला जात असे. आजही जुने सिनेमे उचलून बघितलेत तर फुले, वाहणाऱ्या नद्या, पक्ष्यांवर चित्रित केलेली ती सगळी दृश्ये दिसतील. आज हिंदी चित्रपटसृष्टीला 100 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि आता अशी दृश्ये करणे अगदी सामान्य झाले आहे.

'या' चित्रपटाचे शूटिंग कसे झाले-

'कर्मा' चित्रपटातील या किसिंग सीननंतर चित्रपटाचे निर्माता आणि अभिनेता-अभिनेत्री यांच्यावर बरीच टीका झाली होती आणि चित्रपटावर बंदीही घालण्यात आली होती. त्यावेळी पडद्यावर सीन करणं ही मोठी गोष्ट होती पण अभिनेता हिमांशू राय आणि देविका राणी यांनी असं करून मोठं पाऊल उचललं होतं.विरोध होऊनही हा चित्रपट शूट होऊन रिलीजही झाला होता.

देविका आणि हिमांशू हे पती-पत्नी होते

देविका राणी आणि हिमांशू पती-पत्नी होते, त्यामुळे त्यांना हा सीन करण्यात कोणतीही अडचण आली नाही.

Whats_app_banner