मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Riteish Deshmukh: रितेश देशमुख राजकारणात येणार? देवेंद्र फडणवीसांनी दिला मोलाचा सल्ला

Riteish Deshmukh: रितेश देशमुख राजकारणात येणार? देवेंद्र फडणवीसांनी दिला मोलाचा सल्ला

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 10, 2023 08:28 AM IST

Devendra Fadnavis Suggestion: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एका पुरस्कार सोहळ्यात एक राजकीय भविष्यवाणी केली. या भविष्यवाणीमध्ये त्यांनी अभिनेता रितेश देशमुखचा उल्लेख केला.

Devendra Fadnavis Suggestion
Devendra Fadnavis Suggestion

नुकताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्याला अभिनेता रितेश देशमुख सुद्धा उपस्थित होता. या कार्यक्रमात फडणवीस यांनी त्यांचे मनोगत सादर करताना रितेशला मोलाचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी घडामोडींविषयी मोठा दावा केला.

पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तुम्ही पहिल्या वर्षी आम्हाला बोलवले. पुढच्या वर्षी आम्हालाच बोलवा. पुढच्याही वर्षी डिसेंबरमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मीच राहणार आहे. अर्थात याला एक कॅव्हिट आहे, रितेशजी राजकारणात यायचे नाही आणि आलात तर कुठून यायचे ते मी तुम्हाला सजेस्ट करतो." पुढे ते म्हणाले, “आमच्यासोबत अजित दादांनाही बोलवा तेही एक वेगळे कलाकार आहेत.”
वाचा: लाइट बंद होताच अभिषेक-खानजादी दिसले एकाच चादरमध्ये, व्हिडीओपाहून चाहते संतापले

पुढे त्यांनी मराठी रंगमंच हा अतिशय दमदार आहे असे म्हटले. “तुम्ही हा पुरस्कार सुरु केला याचा मला अतिशय आनंद आहे. मराठी रंगमंच हा अतिशय दमदार आहे. देशामध्ये कलात्मकता ज्यांनी जपली ते आपण मराठी लोक आहोत. कदाचित आमचे बजेट मोठे नसेल. पण मी हे दाव्याने सांगतो जी कलात्मकता मराठी सिनेमा, मालिकांमध्ये आहे ती कुठेच बघायला मिळत नाही. मराठी कलावंतांनी नाटक जिवंत ठेवले आहे. नाटक जिवंत ठेवण्याचे सर्वात जास्त काम मराठी कलावंतांनी केले आहे. त्यामुळे अशाप्रकारे पुरस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण जे चांगले आहे त्याचे कौतुक करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ते आज या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून केले आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

WhatsApp channel