मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Devendra Fadnavis: ही तर सुरुवात आहे; सुमीत राघवनच्या 'त्या' ट्वीटला फडणवीस यांचा गाण्यातून रिप्लाय
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस (HT)

Devendra Fadnavis: ही तर सुरुवात आहे; सुमीत राघवनच्या 'त्या' ट्वीटला फडणवीस यांचा गाण्यातून रिप्लाय

25 January 2023, 18:27 ISTAarti Vilas Borade

Sumeet Raghavan: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमीत राघवनचे का मानले आभार? जाणून घ्या.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईत विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत ३८ हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या प्रकल्पाचा समावेश आहे. कंटाळलेल्या मुंबईकरांसाठी ही मेट्रो अतिशय सुखकर ठरत आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता सुमीत राघवने देखील मेट्रोने प्रवास करताना अनुभव सांगितला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणे शेअर करत सुमीतचे आभार मानले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

देवेंद्र फडणवीसांनी समीत राघवनचे आभार मानत 'थोडा है थोडे की जरूरत हैं' हे प्रसिद्ध गाणे ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. त्यांचे हे ट्वीट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वाचा: RRRचे दिग्दर्शक राजामौली यांच्या हत्येचा कट; राम गोपाल वर्माचे धक्कादायक ट्वीट

काय आहे देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट?

'समान्य माणसाची सेवा करण्यापेक्षा आणखी छान काय असणार. कौतुक केल्याबद्दल सुमीत राघवन तुमचे धन्यवाद. मुंबईकरांसाठी फील गुड वेळेची ही तर फक्त सुरूवात आहे. आपली मुंबई आणखी सुंदर आणि वेगवान होणार आहे. मुंबईकरांनो तुम्ही फक्त अशीच साथ देत रहा' असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

काय होते सुमीत राघवनचे ट्वीट?

'गणपती बाप्पा मोरया. मला मी एखाद्या खेळण्याच्या दुकानात आल्याप्रमाणे वाटत आहे. मुंबईकरांसाठी हे सर्वोत्तम गिफ्ट आहे. धन्यवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस' असे सुमीतने म्हटले होते. त्यासोबतच त्याने मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गावर प्रवास करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.