Devara Part1Trailer: अभिनेता ज्युनिअर एनटीआरचा मोस्ट अवेटेड चित्रपट'देवरा पार्ट-१'चा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर चाहत्यांना या चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. ज्युनिअर एनटीआरची दमदार स्टाईल या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली आहे. तर, जान्हवी कपूरसोबतची त्याची केमिस्ट्रीही चांगली जमून आली आहे.'प्राचीन काळात नरकासुर नावाचा राक्षस राहत होता. तो लोकांना खूप त्रास देत असे’, अशा संवादाने'देवरा भाग-१'चा ट्रेलर सुरू होतो. ज्युनिअर एनटीआरचा उग्र अवतार ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सैफ अली खानचीही झलक पाहायला मिळाली आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर'देवरा पार्ट १'मधून साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. त्यांचे चाहते देखील त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, याआधी चित्रपटातील'धीरे धीरे'आणि'दावुडी'ही दोन गाणीही रिलीज झाली आहेत. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.
‘देवरा पार्ट १’ हा एक तेलुगू ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे, जो २७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कोरटाला शिवा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनही केले आहे. या चित्रपटाची निर्मिती युवासुधा आर्ट्स आणि एनटीआर यांनी केली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार,चित्रपटाचे बजेट ३०० कोटी रुपये आहे. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय प्रकाश राज,मिका श्रीकांत,शाइन टॉम चाको आणि चैत्रा रॉय हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'देवारा'चा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरची वेगळी शैली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘देवारा’चा ट्रेलर ॲक्शनने भरलेला भरलेला आहे. रक्तपात,रोमान्स,सर्व काही देवावराच्या ट्रेलरमध्ये भरपूर दिसत आहे. सैफ अली खानही खलनायकाच्या भूमिकेत चांगला दिसतोय. ‘देवारा’चा ट्रेलर ॲक्शनने भरलेला आहे. देवरा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना हा नरसंहार पाहायला मिळाला. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आणखीनच उत्कंठा वाढवली आहे. आता सगळेच या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातून जान्हवी कपूर तिच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे.