मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'देव माणूस' फेम अभिनेत्याच्या भावाने संपवलं आयुष्य; पोस्ट लिहीत म्हणाला...

'देव माणूस' फेम अभिनेत्याच्या भावाने संपवलं आयुष्य; पोस्ट लिहीत म्हणाला...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 29, 2023 09:58 AM IST

Eknath Gite Brother Death:अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत ही दुःखद बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

Eknath Gite Brother Death
Eknath Gite Brother Death

Eknath Gite Brother Death: मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका 'देवमाणूस'मधील अभिनेता एकनाथ गीते यांच्या लहान भावाने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत ही दुःखद बातमी चाहत्यांना सांगितली आहे. लहान भावाच्या आत्महत्येमुळे एकनाथ गीते आणि त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर भावाच्या निधनाची बातमी शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ गीतेने भावाच्या फोटोंसोबत एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्याने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘एक आठवडा झाला तुला जाऊन आज... अजूनही खरं वाटत नाहीये. हे वाईट स्वप्न संपून जाग का येत नाहीये मला? असंच वाटतंय सतत… आयुष्यभराची हुरहूर लावून गेलास रे मनाला... खूप सारे प्रश्न सोडून गेलास... कुठे शोधू मी उत्तरं? आणि उत्तरं मिळाली तरी तू नाहीस न दिसणार परत कधीच, कुठेच… फक्त भाऊ नव्हतो ना आपण, मित्र पण होतो ना रे... का नाही व्यक्त झालास माझ्या जवळ या वेळेस? आत्महत्या पर्याय कसा असू शकतो रे विजु? कसं जगायचं आम्ही आता तुझ्याशिवाय बाळा???????’

एकनाथ गीतेची ही पोस्ट वाचून त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यांत देखील अश्रू तरळले आहेत. या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी आपल्या मनातील शोक व्यक्त केला आहे. 'बापरे! काळजी घे एकनाथ! सगळ्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरायला बळ मिळो. भावपूर्ण आदरांजली!', 'या जाणाऱ्या लेकराला भावपूर्ण श्रद्धांजली', 'वाटल नव्हतं विजू भैया तू असा टोकाचा निर्णय घेऊन सर्वांपासून इतका लांब निघून जाशील माहिती नाही, तू तुझ्यापरीने तरी जिंकला अशील की नाही..... पण तू किमान एकदा त्या आईचा विचार करायला हवा होता, जिने तुला लहानाचं मोठं केलं, तिच्या डोळ्यासमोर तुझं आयुष्य संपवलं.... तुझी नेहमी आठवण येईल विजू भावा.. तू स्वतः दुसऱ्यांना सांगायचा, अन् तू स्वतः कसा असं वागू शकतो सर्व गोष्टीवर उपाय असतो, असं म्हणायचास ना आता कुठ गेला तो विजू? हरवला आहे....जो कधीच दिसणार आता', असं म्हणत चाहत्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग