Dev Anand : बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन, चाहत्यांसाठी लिहायचे पत्र! देव आनंदबद्दल 'हे' ऐकलंय का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dev Anand : बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन, चाहत्यांसाठी लिहायचे पत्र! देव आनंदबद्दल 'हे' ऐकलंय का?

Dev Anand : बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन, चाहत्यांसाठी लिहायचे पत्र! देव आनंदबद्दल 'हे' ऐकलंय का?

Dec 03, 2024 08:43 AM IST

Dev Anand Death Anniversary : 'प्रेम पुजारी', 'गाइड', 'मंझिल' आणि 'हरे कृष्ण हरे रामा' सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या आणि बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन अशी ओळख असणाऱ्या अभिनेता देव आनंद यांची आज (३ डिसेंबर) पुण्यतिथी आहे.

Dev Anand
Dev Anand

Dev Anand Death Anniversary : आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते होते. 'प्रेम पुजारी', 'गाइड', 'मंझिल' आणि 'हरे कृष्ण हरे रामा' सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या आणि बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन अशी ओळख असणाऱ्या अभिनेता देव आनंद यांची आज (३ डिसेंबर) पुण्यतिथी आहे. ते त्यांच्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. चित्रपटांप्रमाणेच देव यांचे आयुष्यही खूप मनोरंजक होते. आज जरी ते आपल्यात नसले, तरी चाहते आजही त्यांची आठवण काढतात. 

अभिनेता तसेच लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देव आनंद, जे बॉलिवूडमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. त्यांनी जवळपास ६ दशके सिनेविश्वावर राज्य केले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाची अशी काही छाप सोडली की, त्यांचे कार्य आजही स्मरणात आहे.

चाहत्यांसाठी हाताने लिहायचे पत्र!

आपल्या दमदार अभिनयाने देश-विदेशात नाव कमावणाऱ्या देव आनंद यांचे खरे नाव धर्मदेव पिशोरीमल आनंद होते. २६ सप्टेंबर १९२३ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्याने दोन वर्षे संघर्ष केल्यानंतर १९४६ मध्ये 'हम एक हैं' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांची खास गोष्ट म्हणजे त्यांना मित्र बनवण्यापूर्वी कोणीही फारसा विचार केला नाही. देव आनंद, रतन टाटा यांचे वडील नवल टाटा, सोली गोदरेज आणि विजय मल्ल्या यांचे वडील विठ्ठल मल्ल्या आणि नेपाळचे राजा महेंद्र हे त्यांचे मित्र बनले. या ज्येष्ठ अभिनेत्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा, तेव्हा ते स्वतःच्या हाताने चाहत्यांसाठी पत्र लिहायचे. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी स्वतः हा खुलासा केला होता.

Dev Anand Birth Anniversary: अवघे ३० रुपये घेऊन मुंबईत आले; अभिनेता बनण्याआधी देव आनंद यांनी केलं ‘हे’ काम!

देव आनंद कसे बनले फॅशन आयकॉन?

देव आनंद यांनी 'विद्या', 'जीत', 'शायर', 'अफसर', 'दो सितारे' आणि 'सनम'सह ११६ चित्रपटांमध्ये काम केले. देव आनंद शेवटचे 'चार्जशीट' चित्रपटात दिसले होते, जो त्यांच्या निधनाच्या ३ महिने आधी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. देव आनंद यांनी स्कार्फ, मफलर आणि जॅकेट या गोष्टी फॅशन ट्रेंडमध्ये आणल्या होत्या. आजही लोक त्यांचा काळा कोट आणि पांढरा शर्ट लुक कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या ६५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी त्यांच्या सिग्नेचर पफने फॅशन स्टेटमेंट बनवले आणि ते बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन बनले.

Whats_app_banner