‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया!’ हे गाणे तोंडून निघाले की सर्वात आधी देव आनंद यांची आठवण येते. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील पहिला चॉकलेट बॉय म्हणून देव आनंद हे ओळखले जायचे. तसेच विशिष्ट पद्धतीने मान वाकडी करुन वावरणाऱ्या देव आनंद यांनी हिंदी सिनेसृष्टीमधील एक काळ प्रचंड गाजवला होता. देव आनंद यांचे आयुष्य कमालिचे होते. ते सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते. मात्र वृद्धापकाळात केला जाणारा ‘देवसाहब’ हा उल्लेख त्यांना कधीच आवडला नाही. आज देव आनंद यांची जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी...
देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी पंजाबमध्ये झाला. पण भारत-पाक फाळणीदरम्यान पंजाबचा हा भाग पाकिस्तानमध्ये सामिल झाला होता. त्यामुळे देव आनंद यांच्या कुटुंबीयांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी १९४६ साली करिअरला सुरुवात केली. पण करिअरला सुरुवात करण्यासाठी देव आनंद यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. पहिला चित्रपट मिळवणे त्यांच्यासाठी खूप कठीण झाले होते.
देव आनंद हे कायमच त्यांच्या अनोख्या स्टाईल आणि भूमिकांमुळे चर्चेत असते. ज्या वेळी त्यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. फार कमी लोकांना माहिती आहे की देव आनंद यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यापूर्वी ब्रिटीश सरकराची नोकरी केली आहे. अभिनेत्या होण्याचे स्वप्न असल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांचे नाव अभिनेत्री सुरैयासोबत जोडण्यात आले होते. त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांचा या नात्याला नकार होता. त्यामुळे सुरैया यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला. देव आनंद यांनी अभिनेत्री कल्पना कार्तिकशी लग्न केले. तेही चित्रपटाच्या सेटवरच.
वाचा: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशाचा दावा खोटा? FFIच्या अध्यक्षांनी सांगितले सत्य
देव आनंद यांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहीले आहे. त्यांनी बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्रींना डेट केले आहे. हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाच्या वेळी देव आनंद यांचे नाव अभिनेत्री झीनत अमानशी जोडण्यात आले होते. देव आनंद यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी झीनत परफेक्ट वाटल्या आणि त्यांनी या चित्रपटासाठी झीनत अमान यांनाच साईन केले. इतक्या सुंदर अभिनेत्री आयुष्यात येऊन गेल्यानंतरही देव आनंद एकटेच आयुष्य जगत होते. शेवटच्या काळात त्यांना एकट्याला राहायचे होते. आपला मृत्यू भारत देशाबाहेर व्हावा, अशी देव आनंद यांची इच्छा होती. ३ सप्टेंबर २०११ रोजी लंडनमध्ये वास्तव्यास असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले.