बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल येत्या रविवारी, २३ जून रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाआधी दोन्ही कलाकार आपल्या मित्रांसोबत बॅचलर पार्टी सेलिब्रेट करताना दिसत आहेत. झहीरने आपल्या बॉईज गँगसोबतच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता साकिब सलीम आणि त्याचे इतर मित्र दिसत आहेत. मात्र, फोटो शेअर करताना अभिनेत्याने आपल्या बॅचलरेट पार्टीची घोषणा केलेली नाही. झहीर एका वेगळ्याच आउटफिटमध्ये दिसत आहे. एका फोटोत तो काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. इतरांनी पांढरे टी-शर्ट घातले आहेत.
झहीरच नाही तर सोनाक्षी सिन्हादेखील तिच्या गर्ल गँगसोबत एन्जॉय करताना दिसली. अभिनेत्रीचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. तिच्यासोबत तिच्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटातील अभिनेत्री आणि मैत्रीण हुमा कुरेशी देखील आहे.
सोनाक्षी आणि झहीर अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचा हा भव्य सोहळा वैगरे पार पडणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर, सोहळ्या ऐवजी दोघेही नोंदणीकृत विवाह करणार आहेत. यानंतर बॉलिवूड मित्रमंडळींसाठी मोठी पार्टी देण्यात येणार आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. मुलीच्या या निर्णयावर शत्रुघ्न सिन्हा नाराज असून ते लग्नाला उपस्थित राहणार नाहीत, अशीही अफवा पसरली आहे.
काही काळापूर्वी या अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नाच्या बातमीवर आपली प्रतिक्रिया देताना केलेल्या वक्तव्यात म्हटले होते की, ‘आजकालची मुले कोणाचेही ऐकत नाहीत.’ यामुळेच असे मानले जात आहे की, अभिनेत्रीचे वडील या लग्नावर खूश नाही. पण, काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, कुटुंबातील सदस्य या लग्नात सहभागी होणार आहेत. पण, त्यांना आत्ताच काहीही खुलासा करायचा नाही. आता अभिनेत्री वधूला वेशात पाहण्याची वाट सगळेच पाहत आहेत.
संबंधित बातम्या